Yavatmal News : यवतमाळात वीस लाखांचा मद्यसाठा जप्त,उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Yavatmal : दारूची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. गोव्याची दारू आणून त्याची रिसायकलिंग करत बनावट दारू विक्री केली जाते
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv
Published On

संजय राठोड 
यवतमाळ
: गोवा राज्यातून कमी किमतीत विदेशी मद्य आणून त्याचे रिसायकलिंग करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यवतमाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली असून या कारवाईत सुमारे २० लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. 

दारूची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाते. प्रामुख्याने गोव्याची दारू आणून त्याची रिसायकलिंग करत बनावट दारू विक्री केली जात असते. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यात हि गोव्याहून आणलेले दारू विक्री केली होती. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

Yavatmal News
Garlic Tomato Price : लसूण, टोमॅटोचे दर घसरले; नारायणगाव बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव, लसूणचे दर ४०० ने खाली

महाराष्ट्र मद्य ब्रॅण्डच्या बॉटलमध्ये भरून विक्री 

यवतमाळच्या राळेगाव इथे हा सगळा प्रकार सुरू होता. एका बार मधून ही दारू विक्री केली जात होती. गोवा येथून विदेशी मद्य यवतमाळमध्ये आणणे आणि त्या मद्याला महाराष्ट्रमधील ब्रँड असलेल्या बॉटलमध्ये भरून विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरू होता. ही दारू वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात विक्री केली जात होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळाली होती. 

Yavatmal News
Shirdi Crime : हनुमान मंदिरातील दानपेटी लांबविली; मध्यरात्री दोन ठिकाणी केला हात साफ

दोन जणांना घेतले ताब्यात 

दरम्यान उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पथकाने सदरच्या बारमधून २० लाख रुपयांचा मद्य साठा जप्त केला आहे. तसेच याठिकाणी २ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु असून यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com