Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: निकषात बसत नाहीत,स्वतःहून नाव मागे घ्या,अन्यथा ..., राज्य सरकारकडून आर्थिक दंडाचे संकेत

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांचे नाव बाद करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता याबाबत महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतः हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांना एकतर स्वतः हून नाव बाद करा किंवा पैसे भरावेत, असं सांगण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशिर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहे. दरम्यान आता अपात्र लाडक्या बहि‍णींना स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. याआधी धुळ्यातील आणि पुण्यातील दोन महिलांनी अर्ज स्वतः हून बाद केले आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरु होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, फक्त तक्रारी आल्यास तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल, असं आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.त्यामुळे जर तुम्ही निकषात बसत नसाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आताच सावध व्हा. (Ladki Bahin Yojana Update)

दरम्यान, आता ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी नाव मागे घ्यावेत किंवा ती रक्कम दंडासहित वसून केली जाईल, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केले होते. त्यानंतर अपात्र लाडक्या बहि‍णींना दंड भरावा लागणार असल्याची चर्चा सुरु होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT