Ladki Bahin Yojana : अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

Chhagan bhujbal News : लाडकी बहीण योजनेवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अपात्र महिलांनी अर्ज मागे घ्यावे, त्यांनी मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
Chhagan bhujbal on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मते दिली. विधानसभा निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीला दणका देत सत्तेवर विराजमान झाली. सत्तेवर विराजमान झाल्यावर लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या लाडकी बहीण योजनेवर छगन भुजबळ यांनी मोठं भाष्यं केलं आहे. 'ज्या महिलांचे अर्ज नियमित नाही. त्यांनी स्वत:हून नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी, असं मोठं वक्तव्य केलं आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवलामध्ये लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अनियमिततेवर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. छगन भुजबळ म्हणाले, ' काही प्रमाणात हे खरं आहे. योजनेचे नियम काही वेगळे होते. त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही. मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा योजनेचा उद्देश आहे. जे नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपले नावे काढले पाहिजे.

Chhagan bhujbal on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महिलांना लाडकी बहीण योजनेचे २१०० रूपये कधी मिळणार?
Chhagan bhujbal on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या पैशातून मकरसंक्रांतीला कुटुंबासाठी घरच्याघरी बनवा 'हे' गोड पदार्थ

'ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले, आता ते परत मागण्यात काहीच अर्थ नाही. ते आता मागण्यात येवू नये. पण याच्यापुढे लोकांना सांगावं. जे नियमात नाहीत, त्यांनी स्वतःहून यादीतील नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल. जे झाले ते, लाडक्या बहिणींना अर्पण केलं, असे छगन भुजबळ यांनी केलं. दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Chhagan bhujbal on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महिलांना लाडकी बहीण योजनेचे २१०० रूपये कधी मिळणार?

खातेवाटपावर वाटपावर भाष्य करताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, 'तो विषय संपला आहे. माझ्याविरुद्ध कोणी काही बोलले नाही, तर मी ही कोणाविषयी बोलणार नाही, विषय संपला आहे. त्या सर्वांना शुभेच्छा देतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com