भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

Earthquake in hingoli : हिंगोली पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरली. नागरिक भूकंपाच्या धक्क्याने घर सोडून रस्त्यावर पळाले.

हिंगोलीला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. हिंगोलीच्या पांगरा शिंदे परिसर भूकंपाने हादरला. भूकंपाचे सौम्य धक्का बसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. भूकंपाचे हादरे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जाणवले. परंतु प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. जमीन थरथरल्यानंतर नागिरक घर सोडून पळाले. नागरिक मोठ्या संख्याने सार्वजनिक ठिकाणी जमा झाले. जमिनीतून अचानक गूढ आवाज आल्याने नागरिकांची धावाधाव झाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जिवीतहानी आणि वित्तहानी झाल्याची माहिती हाती आलेल नाही. भूकंप झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com