Shruti Vilas Kadam
एलोवेरा आणि गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट ठेवतात, तर बदामातील व्हिटॅमिन ई त्वचेचे पोषण करते. त्यामुळे चेहरा अधिक तजेलदार आणि फ्रेश दिसतो.
ज्येष्ठमधमध्ये त्वचेचा रंग समतोल ठेवण्याचे गुणधर्म असतात. नियमित वापरामुळे मुरुमांचे डाग आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत मिळू शकते.
लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील जीवाणू कमी होऊन मुरुमांचा त्रास आटोक्यात राहू शकतो.
एलोवेरा जेल त्वचेतील कोरडेपणा कमी करते आणि ओलावा टिकवून ठेवते. त्यामुळे त्वचा मऊ आणि नितळ वाटते.
गुलाब पाणी आणि ज्येष्ठमध त्वचेला थंडावा देतात. उन्हामुळे आलेला टॅन आणि त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यासाठी हा पॅक उपयुक्त ठरू शकतो.
संवेदनशील त्वचेसाठी हा पॅक फायदेशीर ठरू शकतो. एलोवेरा आणि गुलाब पाण्यामुळे त्वचेची जळजळ व लालसरपणा कमी होण्यास मदत मिळते.
बदामातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक त्वचेचे आरोग्य सुधारतात. नियमित वापरामुळे त्वचा अधिक निरोगी आणि तरुण दिसण्यास मदत होते.
1 चमचा एलोवेरा जेल, 1 बदाम, 1 चमचा गुलाब पाणी, 1 लवंग (बारीक पूड), ½ चमचा ज्येष्ठमध पावडर. सर्व साहित्य एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ धुवून हा पॅक लावा. 15-20 मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवा.