Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

2 उकडलेले बटाटे, 1 कप किसलेले चीज, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1/2 कप ब्रेडक्रम्ब्स, चिरलेली कोथिंबीर, मिरची, मीठ आणि तळण्यासाठी तेल घ्या.

Crispy Cheese Balls | ai

बटाट्याचे मिश्रण तयार करा

उकडलेले बटाटे चांगले मॅश करून त्यात मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कॉर्नफ्लोअर मिसळा. हे मिश्रण एकजीव करून घ्या.

Cheese Corn Appe Recipe | pinterest

चीज स्टफिंग भरा

बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्यात थोडे किसलेले चीज भरा. नंतर गोळा व्यवस्थित बंद करून गोल आकार द्या.

Cheese Balls Recipe | Saam Tv

ब्रेडक्रम्ब्सचे कोटिंग करा

तयार गोळे हलक्या पाण्यात किंवा कॉर्नफ्लोअरच्या पातळ मिश्रणात बुडवून ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा. यामुळे बॉल्स अधिक कुरकुरीत होतात.

Cheese Corn Appe Recipe | pinterest

डीप फ्राय करा

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर चीज बॉल्स सोनेरी रंग येईपर्यंत तळा. खूप जास्त आच ठेवल्यास चीज बाहेर येऊ शकते.

Cheese Corn Appe Recipe | pinterest

हेल्दी पर्याय

तळण्याऐवजी हे चीज बॉल्स एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये बेक करू शकता. त्यामुळे तेलाचा वापर कमी होतो आणि स्नॅक अधिक हेल्दी बनतो.

Cheese Potato Recipe | Freepik

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम चीज बॉल्स टोमॅटो सॉस, मिंट चटणी किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा. संध्याकाळच्या चहासोबत हा स्नॅक सर्वांना आवडेल.

Cheese Potato Recipe | Freepik