.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
12 Lakh Women Included Ladki Bahin Scheme: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांना आधारकार्ड सिडिंग प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते त्या लाडक्या बहिणींना देखील आता पैसे मिळणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. तब्बल १२ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. या सर्व महिलांना आजपासून लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याचे पैसे मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
आदिती तटकरे यांनी अधिकृत एक्स अकाऊंटवर लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.'
आदिती तटकरेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे सांगितले की, 'डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या निधी वितरणाची सुरूवात आपण आजपासून करत आहोत. साधारणपणे ९ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचे डिबीटी केले होते. त्यावेळी जवळपास २ कोटी ३४ लाखांपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेचा लाभ दिला होता. डिसेंबर महिन्याचा आज हफ्ता वितरित करत असताना यामध्ये २ कोटी ३४ लाख महिलांचा समावेश आहेच. पण ज्या महिलांना आधार सिडींगमुळे लाभापासून वंचित राहावे लागले होते. त्यामधील ज्यांचे आधार सिडिंग झाले आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा निधी वितरणाची सुरूवात करत आहोत.
'साधारण २ कोटी ३४ लक्ष आणि आता आधार सिंडिंग झालेल्या लाभार्थींना येत्या ४ ते ५ दिवसांत टप्प्या टप्प्याने लाभाचे वितरण करणार आहोत. नव्याने आधार सिंडिंग झालेल्यांपैकी १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ वितरणाची सुरूवात केली आहे. ६७ लाखांपेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरीत करत आहोत. उद्या, परवा आणि आणखी पुढचे २ दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरीत केला जाईल. त्यामुळे अधिकाधिक महिलांना तीन ते चार दिवसांच्या कालावधीत लाभाचे पैसे पोहचणार आहेत.'
'राज्यातील सर्व माता भगिनींना विनंती आहे की, आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या राज्यातील तीन लाडक्या भावांपासून मिळत आहे. याचा आपल्या पुढच्या उद्योगधंद्यांसाठी, वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी योग्य वापर करावा.' असे म्हणत आदिती तटकरे यांनी राज्यातील राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.