Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Sanjay Raut Press Conference: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रमुख नेत्यांचा विरोध होता," असा सर्वात मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!
Sanjay Raut Eknath Shinde NewsSaam TV
Published On

मयुर राणे, मुंबई|ता. १९ मे २०२४

"मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रमुख नेत्यांचा विरोध होता," असा सर्वात मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"एकनाथ शिंदेंनी नेतृत्व करु नये, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका होती. त्यांना कोणताही अनुभव नाही. त्यांनी पक्षाचे नेतृत्व करु नये. एकनाथ शिंदे चालणार नाहीत. अशी भाजपची भूमिका होती. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास विरोध होता. मात्र एकनाथ शिंदे हे विधीमंडळ नेते आहेत, त्यांना संधी मिळू शकते, असे आमचे म्हणणे होते," असा दावा संजय राऊत यांनी केला.

तसेच "राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील यांचाही मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाला विरोध होता. सरकार आल्यास अनुभवी, सर्वांना सोबत घेऊन जाईल असा नेता पाहिजे, आम्ही सर्व ज्येष्ठ नेते आहोत,त्यामुळे नवख्या नेतृत्वाखाली काम करणार नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे होते," असा मोठा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!
Nashik Loksabha: मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट; तब्बल ३ हजार ५१८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता हिमालयात जाऊन बसायचेच आहे. त्यांचे सरकार जात आहे, त्यांनी त्याची करावी ४ जूननंतर देशात सत्ता बदल होत आहे. त्यानंतर त्यांना पुजा, अर्जा करावी, राज्य आम्ही करणार आहोत, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी केला.

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!
Sharad Pawar News: '...म्हणून २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी सोडली'; छगन भुजबळांचे नाव घेत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com