Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचे १५०० रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana Next Installment Date: लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष होते. दरम्यान, आदिती तटकरेंनी जानेवारीच्या हप्त्याची तारीख सांगितली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला होता. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)

दरम्यान, मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आता जानेवारीचे १५ दिवस उलटून गेले आणि मकरसंक्रांतदेखील उलटून गेली परंतु अजूनही पैसे महिलांच्या अकाउंटला जमा झाले नाहीत म्हणून महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख ठरली आहे. (Ladki Bahin Yojana January month installment)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता २६ जानेवारी २०२५ रोजी जमा होणार आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना दिलासा मिळाला आहे. २६ जानेवारीच्या आधीपासूनच आम्ही लाडक्या बहि‍णींना हप्ता देणार आहोत. या महिन्यात १५०० रुपये मिळणार आहेत.आम्ही आमच्या घोषणा पत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. आता आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत, असं आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी ३,६९० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली आहे. याच निधीतून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरीत केली जाईल.लाभार्थी महिलांना वेळेवर हप्ता देणे हे प्राधान्य आहे, असंही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT