Ankush Dhavre
राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनतंर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत.
जुलैपासून या योजनेचे पैसै यायला सुरुवात झाली आहे.
आता जानेवारीच्या हफ्त्याचे पैसे केव्हा मिळणार? जाणून घ्या.
यापूर्वी डिसेंबर महिन्याचा हफ्ता हा २४ डिसेंबरला देण्यात आला होता.
त्यामुळे जानेवारी महिन्याचा हफ्ताही लवकरच अकाऊंटमध्ये येऊ शकतो.
डिसेंबर महिन्यातही महिलांना १५०० रुपये दिले गेले होते.
त्यामुळे जानेवारी महिन्यातही महिलांना १५०० रुपये हफ्ता मिळेल, असं म्हटलं जात आहे.