Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जानेवारीचा हफ्ता मिळणार, सरकारने तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana January Installment: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हफ्ता कधी मिळणार आहे याची माहिती लाडक्या बहिणींना दिली आहे.
Ladki Bahin Yojana Updates
Ladki Bahin Yojana UpdatesSaam Tv
Published On

Ladki Bahin Yojana Updates : राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी २०२५ चा हफ्ता लवकरच मिळणार आहे. २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचे योजनेचे पैसे बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जानेवारी महिन्यातील हफ्ता २६ जानेवारीआधी दिला जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. पण जानेवारी महिन्याच्या हफ्यात लाडक्या बहिणींना १,५०० रुपये मिळणार आहेत. येत्या काही दिवसात बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले आहे.

'जानेवारीसोबत आम्ही फेब्रुवारी महिन्याचेही नियोजन करत आहोत. योजनेसाठी ३,६९० कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळीही महिलांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत. या योजनेचा लाभ २ कोटी ४६ लाख महिलांना होत आहे. काही महिलांबाबत तक्रारी होत्या. ड्युप्लिक्शन केसेस कमी होत्या. तेव्हा फार काही फरक पडेल असे वाटत नाही', असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana Updates
Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर दोन दिवस पॉवर ब्लॉक! कोणत्या लोकल रद्द, कोणते मार्ग बंद, पाहा वेळापत्रक

जानेवारी प्रमाणे फेब्रुवारी महिन्यातही १,५०० रुपये दिले जाणार आहेत. नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळात २,१०० रुपये देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. ३ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला मांडला जाणार आहे. तेव्हा मार्च महिन्यापासून २,१०० रुपयांचा हफ्ता दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana Updates
Saif Ali Khan: सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा हाच तो... CCTV फुटेज बघा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com