Saif Ali Khan: सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा हाच तो... CCTV फुटेज बघा

Saif ali khan attacked: सैफवर हल्ला करणाऱ्या संशयित हल्लेखोराचा फोटो समोर आलाय. संशयित हल्लेखोराचा फोटो सीसीटीव्ही फुटेजवरून घेण्यात आला असून, या फोटोच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Saif ali khan news
Saif ali khan newsSaam Tv News
Published On

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. चाकूने त्याच्यावर ६ वार करण्यात आले होते. त्यातील २ वार अत्यंत खोलवर असल्याची माहिती आहे. पोलीस तपास करत असताना त्यांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज आलं आहे. त्यात हल्लेखोराचा चेहरा दिसत असून, तो पायऱ्यांचा वापर करून पळ काढण्याचा प्रयत्नात दिसत आहे. संशयित हल्लेखोराचा फोटो सीसीटीव्ही फुटेजवरून घेण्यात आलाय. याच फोटोच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री हल्लेखोराने चाकूने हल्ला चढवला. धारदार शस्त्राने वार करत त्याला जखमी केलं. वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात घुसून त्याला जखमी केल्याची माहिती समोर आलीय. त्याच्यावर चाकूने ६ वार केले असून, २ खोलवर जखमा केले असल्याची माहिती आहे. अशातच ज्याने सैफवर वार केले, त्या संशयित हल्लोखोराला सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केलं आहे. सीसीटीव्हीमध्ये सशंयित हल्लेखोर पायऱ्यांवरून पळ काढताना दिसत आहे.

Saif ali khan news
Baldness Virus: टक्कल व्हायरसमुळे मुलांचे लग्न जुळेना! बुलढाण्यातील गावकरांच्या अडचणीत वाढ

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित हल्लेखोर स्पष्ट दिसत आहे. संशयित हल्लेखोराने फ्लॅटच्या पायऱ्यांचा वापर करून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, सहाव्या मजल्यावरील लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात आणि पकडण्यात पोलिसांना मदत होणार आहे.

Saif ali khan news
Crime News: अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काटा काढला, दारू पाजली अन् मग...

आरोपी पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसला

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, त्याचा छडा लवकरात लवकर लागावा म्हणून पोलिसांनी त्याचे छायाचित्र व्हायरल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित हल्लेखोराने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. त्याच्या पाठीवर बॅग दिसत आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित हल्लेखोर पायऱ्यांवरूव खाली उतरताना दिसत आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com