Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर दोन दिवस पॉवर ब्लॉक! कोणत्या लोकल रद्द, कोणते मार्ग बंद, पाहा वेळापत्रक

Central Railway Mega Block News : मध्य रेल्वेवर उद्या शुक्रवार (१७ जानेवारी) आणि रविवार (१९ जानेवारी) या दोन दिवशी पॉवर ब्लॉक असणार आहे. या दोन दिवसांचे रेल्वेचे वेळापत्रक कसे असेल हे जाणून घ्या.
Central Railway Mega Block News
Central Railway Mega Block NewsSaam Tv
Published On

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेवर उद्या म्हणजेच शुक्रवारी (१७ जानेवारी) आणि रविवारी (१९ जानेवारी) या दोन दिवशी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. कर्जत यार्ड सुधारणेच्या संदर्भात कर्जत स्थानकावरील पोर्टल्स ऑफलोडिंग करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी मध्य रेल्वे ब्लॉक परिचालीत करणार आहे.

१७ जानेवारी २०२५ च्या ब्लॉकचा तपशील

ब्लॉकचा कालावधी : १३.५० ते १५.३५

ट्रॉफिक ब्लॉक सेक्शन :

- पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाईन

- कर्जत (कर्जत प्लॅटफार्म ३ च्या पनवेल एंड क्रॉसओवरसह) ते चौक/भिवपुरी स्टेशन (क्रॉसओवर वगळून) दरम्यान अप आणि डाउन लाईन

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम :-

ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा रद्द राहतील.

- खोपोली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२० वाजता सुटणारी आणि कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.१९ वाजता सुटणारी लोकल अंबरनाथ स्थानकावर थांबवली जाईल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १३.४० वाजता सुटणारी कर्जत लोकल बदलापूर स्टेशनवर थांबेल.

- कर्जत येथून १३.५५ वाजता आणि खोपोली येथून १३.४८ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल ट्रेन अंबरनाथ स्थानकावरून सुटेल.

- कर्जत येथून १५.२६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल ट्रेन बदलापूर स्टेशनवरून सुटेल.

Central Railway Mega Block News
Saif Ali Khan: सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा हाच तो... CCTV फुटेज बघा

१९ जानेवारी २०२५ च्या ब्लॉकचा तपशील

ब्लॉकचा कालावधी : ११.२० ते १३.०५ वाजता

ट्रॉफिक ब्लॉक सेक्शन :

- पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाईन

कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक/भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) दरम्यान अप आणि डाउन लाइन

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम :-

ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोली दरम्यानच्या उपनगरीय सेवा रद्द राहतील.

- कर्जत-खोपोली लोकल १२.०० आणि १३.१५ वाजता कर्जत येथून सुटणाऱ्या तसेच खोपोली-कर्जत लोकल ११.२० आणि १२.४० वाजताच्या उपनगरी ट्रेन रद्द असतील.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.२७ ते ११.१४ या वेळेत निघणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत उपनगरी ट्रेन्सला नेरळ स्थानकावर नियमन (थांबविण्यात) करण्यात येणार आहे.

- कर्जत-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१९ ते १३.०० या वेळेत सुटणाऱ्या उपनगरी ट्रेन नेरळ पर्यंत.

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे काम

- ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस लोणावळ्यात ११.३० ते १२.४० या वेळेत नियमन केले जाईल.

- ट्रेन क्रमांक 12493 पुणे - हजरत निजामुद्दीन वातानुकूलित एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक 12164 चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पुणे विभागात नियमन केल्या जातील आणि १२.५० वाजल्या नंतर लोणावळा येथे पोहचेल.

दोन्ही दिवसांमधील मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षितता यासाठी गरजेचा आहे. होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Central Railway Mega Block News
Saif Ali Khan Attack: सैफच्या घरात चोरांनी कसा प्रवेश केला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com