Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६, महाराष्ट्रात आजपासून अर्थसंक्लपीय अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, अवकाळी पाऊस, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

मिरा-भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान मैदानी चाचणीपूर्वीच उत्तेजक द्रव्य घेणाऱ्या एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

बारामतीचा 23 वर्षीय असलेल्या साहिल अवघडे याने ताकद वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेतला, मात्र सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, निर्यातीवरील रोड टेप सवलत घटवली

- कांदा निर्यातीवरील रोड टेप सवलत घटवली, ५० टक्क्यांनी रोड टेप सवलत घटवली

- आत्तापर्यंत कांदा निर्यातीवर १.९ टक्के प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येत होता

- मात्र आता तात्काळ प्रभावाने ही सवलत ५० टक्क्यांनी घटवली

- कांदा निर्यातीवर आता १.९ टक्क्यांऐवजी ०.९५ टक्केच प्रोत्साहनात्मक निधी मिळणार

Kolhapur : कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा, प्रादेशिक स्तरावर होणार चौकशी

कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी ठेकेदारांनी केलेल्या संबंधित घोटाळ्याची प्रसारित केली होती साम टीव्हीने बातमी

कोल्हापुरातील शेंडा पार परिसरातील 224 कोटी रुपयांच्या विकास कामात 65 ते 70 लाखांचा घोटाळा झाल्याची साम टीव्ही ने दाखवली होती बातमी

शेंडा पार्क परिसरातील रस्ता करण्या अगोदरच काढण्यात आली होती वर्क ऑर्डर

अधिकारी आणि ठेकेदारांनी संगणमताने भ्रष्टाचार केल्याचा साम टीव्ही ने केला होता पर्दाफाश

बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाचे धागेदाेरे तेलंगणा, कर्नाटक, केरळपर्यंत पोहोचले

बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवून स्त्री बीज तस्करी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी असणारी बदलापूर मधील ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर हिला अटक करत तसंच तिच्या साथीदार अश्विनी चाबुकस्वार मंजुषा वानखडे पोलिसांनी मुस्क्या आवळल्या या तिन्ही आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .

Solapur Rain : सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

- सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांच्या पिकाला फटका

- जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यात दमदार पाऊस..

- जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी पिकाला धोका..

नांदेडमध्ये हिमायतनगरमध्ये वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू

हिमायतनगर तालुक्यातील पार्डी येथे वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू.

35 वर्षीय विशाखा येलकेवाड यांचा मृत्यू

शेतात हळद काढताना अचानक वादळी वाऱ्यासह झाला पाऊस.

त्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू.

Pune fire : पुणे स्टेशन जवळ हॉटेलला लागली आग 

पुणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक एक येथे एका हॉटेलमध्ये आगीची घटना

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण.

जखमी कोणी नाही

आगीचे कारण अस्पष्ट

Wardha : वर्ध्यातील मांडगावात अवकाळी पाऊस

समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव परिसराला अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका

हिंगणघाट तालुक्यातील काही गावांनाही तुरळक गारपीट वादळाचा फटका

परिसरातील सात ते आठ गावांच्या परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

Thane : ठाण्यातील हिलेपॅडजवळ काटेरी झाडांना लागली आग

ठाण्यातील साकेत मैदानाच्या हिलेपॅड जवळ काटेरी झाडांना लागली आग

लागलेली आग ही नियंत्रणात असून अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले आहेत. लागलेली आग विझविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे

पुढील दोन ते तीन दिवस पाऊसाचे

दक्षिण महाराष्ट्र सह विदर्भात पाऊस पडणार

सत्ताधारी राजधर्म पाळत नाही याचं दुखः - हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे संत ज्ञानेश्वर मंदिरात पैस खांबाचे दर्शन घेतले.. यावेळी त्यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टिका केलीय.. सत्ताधाऱ्यांना लोकशाही मान्य नाही, हे अधर्मी सारखे वागत असून राजधर्म पाळत नाही याचे दुखः असल्याचं म्हणटलंय.. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्याच्या प्रश्नावर सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाना साधलाय..

पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

शेतकरी शिवाजी बांदल शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेले असताना विहिरीत बिबट्या पडल्याच त्यांच्या निदर्शनास आलं..

शेतकऱ्यांनी ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर, वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू टीमच्या सदस्यांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून काढले बाहेर..

वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे बिबट्याचा जीव वाचला असून, बिबट्या पकडला गेल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे..

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सापडलेला बिबट्या वयाने लहान असून परिसरात त्याची आई किंवा इतर बिबटेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही..त्यामुळं वनविभागाकडून सतर्क राहण्याच आवाहन स्थानिकांना करण्यात आलंय

पकडलेल्या बिबट्याला सध्या बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे.. बिबट्यावर प्राथमिक औषधं उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार.

बदलापूर गाव परिसरात नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बदलापूरात 430हून अधिक अतिक्रमणं हटवण्याची मोहीम 15 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. गेली 8 दिवस कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा कुळगांव-बदलापूर नगर परिषदेनं बदलापूर शहरातील अतिक्रमणांवर कारवाईला पुन्हा सुरुवात केलीय. बदलापूर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूला उभारलेली अनधिकृत हॉटेल्स, शेड, भंगारच्या दुकानांवर पालिकेनं जेसीबी फिरवलाय. जवळपास 70 ते 80 दुकानांवर यावेळी कारवाई करण्यात आली असून यापुढील काळात ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी स्पष्ट केलय..

नाशिक महापालिका स्थायी समिती सभापती पदाची रस्सीखेच वाढली

भाजपकडून मच्छिंद्र सानप यांनी भरला आहे उमेदवारी अर्ज

तर अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीकडून ( AP ) सभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आल्यानं निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आमने सामने

भाजपकडून खबरदारी म्हणून भाजपच्या स्थायी समिती सदस्यांना अज्ञास्थळी केले जात आहे रवाना

सदस्यांचा घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपकडून खबरदारी

राष्ट्रवादी ( AP ) कडून अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीसोबत गट नोंदणी केलेल्या मुकेश शहाणे यांना स्थायी सभापती पदाची उमेदवारी

मुकेश शहाणे यांनी देखील भरला आहे सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज

Parbhani: परभणीत जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

परभणी -

परभणीत जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

परभणीच्या गंगाखेड पालम तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी

ज्वारी पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Nanded: नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात

नांदेड -

नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात

अवकाळी पावसामुळे गहू हरभरा अंबा ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता.

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण कायम.

आज नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा.

काढून ठेवलेला हरभरा गहू पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ.

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसाला सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण विभागामध्ये आज पावसाने हजेरी लावलेली आहे

वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपये नुकसान झालेले आहे

शेतामध्ये असलेला पांढरा सोनं घरी नेण्याची वेळ आलेली आहे

मात्र आज पाण्याने कापूस पूर्ण भिजलेला दिसून राहिलेला आहे

त्यामुळे शेतकरी हवालदिल होत दिसून येत आहे तरी शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी

Latur: लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

लातूर -

लातूरमध्ये आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव परिसरात वादळीवारासह गारांचा पाऊस झाला

दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं फळबागांचे मोठे नुकसान झालं.

तर पुढील काही तास लातूर जिल्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे

Ahilyanagar - कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी करावी, पुणतांबातील शेतकऱ्यांची मागणी

अहिल्यानगर -

- सातबारा कोरा कोरा कोरा... अटीशर्ती नको..

- घोषणाबाजी करत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी

- कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी करावी

- ऐतिहासिक शेतकरी संपाचे गाव असलेल्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांची मागणी

- सातबारा..कोरा..कोरा.. कोरा ".. अशा घोषणा देत शेतकऱ्यांची मागणी

Wardha: प्रस्तावीत कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज माहितीचे संकलन

वर्धा -

- प्रस्तावीत कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज माहितीचे संकलन

- जिल्हा बँकेची १६१३८ शेतकरी असलेल्या १९६०५ खातेदरांकडे सुमारे १२० कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी

- बँकेकडून १२ हजार ५५८ खात्यांची माहिती अपलोड

- सात हजार सातशेच्या वर शेतकऱ्यांच्या कर्ज माहितीचे संकलन शिल्लक

- थकबाकीदार शेतकऱ्यांनी बँकेला आवश्यक कागदपत्रे, माहिती देण्याचे बँक प्रशासनाचे आवाहन

Latur: लातूराच्या रेणापूर, अहमदपूर भागात अवकाळी पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लातूर -

लातूराच्या रेणापूर, अहमदपूर भागात अवकाळी पाऊस

काढणीला आलेल्या रब्बी पिकांना फटका

गहू, ज्वारी, आंबा, हरभरा पिकांचं नुकसान

Pune: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले

पुणे -

पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले

राष्ट्रवादीच्या सुहास टिंगरेंचा अर्ज बाद झाल्याने भीमालेची बिनविरोध निवड

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास टिंगरे यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

पुण्यात येरवड्यात ६० दुचाकी चारचाकी गाड्या जळून खाक

भूमी अभिलेख कार्यालय येरवडा याठिकाणी मोकळ्या आवारात दुपारी साडेबारा वाजता सुमारे गाड्यांना आग

४० दुचाकी व २० चारचाकी वाहनांनी पेट घेतला आणि आगीत खाक

काहीच चालू गाड्या स्थितीमधील तर काही अडगळीत पडलेल्या गाड्या असल्याचा संशय

अग्निशमन दलाची चार वाहने दाखल होत जवानांनी आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवले.

शिवानी काही शासकीय तर काही स्थानिकांचे जप्त केलेल्या गाड्या असल्याचा अग्निशमन दलाची माहिती

आग कशाने लागली याचा तपास केला जात आहे

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणुकीत चूरस वाढणार

- राष्ट्रवादी ( AP ) गटासोबत नोंदणी केलेले अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडून स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल

- मुकेश शहाणे यांनी अर्ज दाखल करू नये, यासाठी सुरू होते भाजपकडून प्रयत्न

- भाजपचे आमदार राहुल ढिकले स्वतः शहाणे यांची काढत होते समजूत

- मात्र भाजपच्या प्रयत्नांना अपयश, शहाणे यांच्याकडून स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल

- महायुतीमध्ये एक पद राष्ट्रवादीकडे राहावं, यासाठी मुकेश शहाणे यांच्याकडून अर्ज दाखल

- वरिष्ठांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केल्याची मुकेश शहाणे यांची माहिती

Yavatmal: राळेगाव तालुक्याला अवकाळीचा फटका; पिकांचे अतोनात नुकसान

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गहू हरबरा या पिकांचे नुकसान झाले तालुक्यातील कळमनेर, कापसी, रामतीर्थ, वाळधुर, शेळी आणि कोपरी यांसह अनेक गावांना या आपत्तीचा मोठा फटका बसला असून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

माथेरान मधील इ रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरु

रायगडमधील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरानमधील इ रिक्षा चालकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला प्रारंभा झाला आहे. यामुळे ऐन परीक्षांच्या दिवसात विद्यार्थी, स्थानिक नागरीक आणि पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत. पर्यावरणीय दृष्ट्या सेन्सिटीव्ह असलेल्या माथेरानमध्ये इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी असून वाहतुक मानवी रिक्षांच्या माध्यमातून केली जात होती. मानवी रिक्षांची वाहतुक अमानवी असल्याने यावर बंदी घालण्यात आली असून याला पर्याय म्हणून इ रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेत आला. 94 ई रिक्षांना मंजुरी असताना केवळ 20 ई रिक्षा सुरु करण्यात आल्या या विरोधात इ रिक्षा चालकांनी हा बंद पुकारला आहे

शेतकऱ्यांचं गळ्यात दोर घालून झाडावर आंदोलन,यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी येथील शेतशिवारातील घटना

गेल्या 45 वर्षापासून मोबादला मिळावा यासाठी संघर्ष,देवगांव प्रकल्पाच कॅनल गेलाय मात्र नकाशावर दुसर्‍याच शेत दाखविल्याने आंदोलक शेतकरी मोबदल्यापासून वंचित

गजानन होले असे झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव

45 वर्षांपूर्वी सिंचन विभागाने कॅनलकरिता जमीन संपादन केली होती, आंब्याच्या झाडावर चढून जागेची मोजणी करून मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी

घटनास्थळी अद्यापही सिंचन विभागाचे अधिकारी अथवा तहसीलदार कोणीही आलेले नाही

Maharashtra Live News Update: ठाणे महापालिकेत शिंदेसेना अन् भाजपमध्ये खडाजंगी

- महासभेच्या पहिल्याच दिवशी भाजपा शिवसेनेत खंडाजंगी

- ⁠भाजपाचे उपमहापौर कृष्णापाटील यांनी थेट महासभेतून केले वॅाटाआऊट

- ⁠बोलू दिले जात नाही म्हणुन भाजपा महिला नगरसेविकांनी केली घोषणाबाजी

- ⁠शिवसेना जाणीवपूर्वक भाजपाला डावलत असल्याचा केला आरोप

- ⁠आम्ही जनतेला बांधिल आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत भाजपा नगरसेवक आक्रमक

पुण्यात येरवड्यात ६० दुचाकी चारचाकी गाड्या जळून खाक

पुण्यात येरवड्यात ६० दुचाकी चारचाकी गाड्या जळून खाक

भूमी अभिलेख कार्यालय येरवडा याठिकाणी मोकळ्या आवारात दुपारी साडेबारा वाजता सुमारे गाड्यांना आग

४० दुचाकी व २० चारचाकी वाहनांनी पेट घेतला आणि आगीत खाक

काहीच चालू गाड्या स्थितीमधील तर काही अडगळीत पडलेल्या गाड्या असल्याचा संशय

अग्निशमन दलाची चार वाहने दाखल होत जवानांनी आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवले.

शिवानी काही शासकीय तर काही स्थानिकांचे जप्त केलेल्या गाड्या असल्याचा अग्निशमन दलाची माहिती

आग कशाने लागली याचा तपास केला जात आहे

लव जिहाद कायदा झालाच पाहिजे - आमदार संग्राम जगताप

आज धर्मांतर प्रकार पहायला मिळतो एवढेच नव्हे तर आज लव्ह जिहाद पाहायला मिळाला आज भिगवण मध्ये देखील तोच प्रकार घडला असून त्या प्रकरणात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. एवढंचं नाही तर नाशिक मध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला असून लव जिहाद कायदा झाला पाहिजे या करिता मागील सात आठ वर्षांपासून आम्ही संघर्ष करून मागणी करत आहोत आता या अधिवेशनातं देखील लव जिहाद कायदा होईल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात शिवसेना नगरसेवकांकडून गोंधळ

नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात शिवसेना नगरसेवकांकडून गोंधळ

सत्ताधारी भाजपाचे महापौरांचा निषेध … चुकीच्या पध्दतीने महापौर सभागृह चालवत असल्याचा शिवसेनेचा आरोप

नवी मुंबई महापालिका परिवहन समितीवर १२ सदस्य निवडून जाणार आहेत. ही निवड तौलणात्मक संख्याबळाने न करता निवडणूक लावल्याने शिवसेनेने केला महापौरांचा विरोध

सभागृहात खाली बसून शिवसेनेने कडून जोरदार घोषणाबाजी

अजित दादांचा घातपात झाला आहे - भास्कर जाधव

अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहिली.

महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी राज्य सरकारने अधिवेशनात कठोर कायदा करावा... - संभाजी ब्रिगेड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी, अवमान आणि खोटा इतिहास सांगण्या प्रकरणी राज्य सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कडक कायदा करावा. कुणाचीही हिम्मत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचा सक्तीने कठोर कायदा राबवण्यात यावा, शिक्षा व्हावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आम्ही वारंवार छत्रपतींची बदनामी खपवून घेणार नाहीत...

".... तिच आमची शेवटची भेट ठरली" Devendra Fadnavis यांचं भावनिक विधान

पहिल्यांदाच दादांनी टायमिंग चुकवलं : Devendra Fadnavis 

दुर्दैवाने अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही. नशिबानं साथ दिली असती तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. राजकारणात मतभेद असतात, वाद असतात मात्र ते आझाद शत्रू होते. राजकारणात खिलाडूपणा कायम जपला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संघर्षाला अजितदादांनी कधीच पाठ दाखवली नाही - फडणवीस

अजितदादांचा स्वभाव पारदर्शक होता. वक्तशीरपणाची उत्तम सवय होती. अजितदादा नेहमी वेळेतच यायचे. मंत्रालयात येणारे दादा पहिले असायचे. संघर्षाला दादांनी कधीच पाठ दाखवली नाही. काम होणार असेल तर अजितदादा लगेच करायचे, असे फडणवीस म्हणाले. ते विधानसभेत शोक प्रस्तावात बोलत होते.

दुसरे अजितदादा होणे नाही- फडणवीस

दादांनी संघर्षाला कधीही पाठ दाखवलेली नाही.

अजितदादा रोखठोक बोलणारे नेते होते.

अजितदादा एका पिढीचा आत्मविश्वास होते.

दादा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी

मंत्रिमंडळाची बैठक शेवटची ठरली

बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असाल तर - खासदार संजय जाधव

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करताना परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथे महिला आणि शेतकऱ्यांना पोलिसांकडून दमदाटी करण्यात आल्यानंतर आता शिवसेना आणि सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून शक्तीपीठ महामार्गासाठी बळजबरी कदापी जमीन घेऊ घेतल्या जाणार नाहीत जमीन जबरी घेत असतात तर शेतकरी काही मेलेल्या आईचा दूध केलेला नाही. परभणीच्या पालकमंत्री आणि या महामार्गाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर महिला शेतकऱ्यांवर बळजबरी केल्यानंतर या ठिकाणी एक शब्दही बोलल्या नाहीत मात्र देवेंद्र फडवणीस यांनी या महामार्गाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर त्या बोलत आहेत लाडक्या बहीण म्हणता आणि बहिणीवरच अत्याचार करता. मेघना बोर्डीकर म्हणत असतील की काही लोक विकासाला आडवे येत आहेत आणि आम्ही जमिनीचा योग्य भाव देऊ तर आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधून बाजारभावाप्रमाणे जर शेतकऱ्यांना जमिनीचा भाव मिळत असेल आणि शेतकरी जमीन देण्यासाठी तयार असतील तर आम्ही शेतकऱ्यांना जमीन देण्याचे विनंती करू मात्र शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नसतील तर कदापी जमीन घेऊ दिल्या जाणार नाहीत. शक्तीपीठ महामार्ग हा गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी तयार केला जात आहे कारण त्यांना नागपूरवरून खनिज गोव्याच्या पलीकडे न्यायचे आहे अशी खोचक टीका परभणीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. समृद्धी महामार्ग प्रमाणे या महामार्गात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार असल्याची देखील खासदार संजय जाधव म्हणाले आहेत.

बांद्रा म्हाडा कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

बांद्रा येथील म्हाडा कार्यालयाच्या गेटवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात मुंबई अध्यक्षांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. बीडीडी चाळ क्रमांक 88 व 89 यांचा पूर्वनियोजित आराखड्यानुसार इमारत क्रमांक 6 मध्ये समावेश करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच इमारत क्रमांक 6 ची पूर्वी काढलेली लॉटरी रद्द करून नव्याने लॉटरी काढण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

नाशिक स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत येणार ट्विस्ट

- अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे भरणार सभापती पदासाठी अर्ज

- मुकेश शहाणे भाजप उमेदवाराला देणार आव्हान

- मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने सभापती पदासाठी होणार निवडणूक

- महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अपक्ष निवडणूक लढणारे मुकेश शहाणे राष्ट्रवादी ( AP ) च्या गटात सहभागी

- स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे आंदोलन

शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आज राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे. परभणी मध्ये भूसंपादनावेळी प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रोपोलिन गॅस पुण्याहून मुंबईच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या टँकरचे ब्रेक फेल झाल्याने टँकर महामार्गावरील सुरक्षा करता बनवण्यात आलेल्या भिंतीला धडकला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी मुंबईकडे जाणारी सर्व वाहने थांबवली तसेच अवघ्या अर्ध्या तासात अपघात ग्रस्त टँकर महामार्गावरून बाजूला हटवला आहे परंतु अपघात दरम्यान महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत महामार्ग पोलीस सध्या वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत

कृष्णा नदीतील शेकडो माशांचा मृत्यू, शेरीनाल्याचे सांडपाणी व मयूषित पाण्यामुळे मृत्यूचा आरोप

सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हे मासे मृत्यू मुखी पडल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कृष्णा नदीतल्या सांगली बंधारया जवळ शेकडो मासे मृत्यू मुखी पडले आहेत.त्यामुळे नदी काठावर मोठी दुर्गंधी पसरली आहे.कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या खालावली आहे,अशा मध्ये शहरातल्या शेरीनाल्याचे सांडपाणी आणि नदी काठच्या कारखान्यांकडून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.कृष्णा नदी पात्रामध्ये वारंवार मासे मृत्युमुखीच्या घटना घडतात मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून जाणीपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.

Ashok Chavan: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. रविवारी नांदेड मध्ये आयोजित नरेंद्र आणि देवेंद्र महोत्सवा दरम्यान अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . दिन दयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कवी संमेलनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमाला मान्यवरासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune: आता सरपंचच होणार प्रशासक

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत महत्त्वाचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील ७२८ ग्रामपंचायतीवर माजी सरपंचच प्रशासक राहणार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता सरकारी अधिकाऱ्यांऐवजी थेट ग्रामपंचायतीचे सरपंच हेच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाने काढली आहे.

फेब्रुवारी महिना अखेरीस अनेक ग्रामपंचायतची मुदत संपत आहे.

त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत सरपंच हेच प्रशासक असतील.तसेच विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद,पंचायत समित्यांनंतर आता ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्याने निवडणुका दृष्टीक्षेपात आहेत.

पुणे जिल्ह्यातील ७२८ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात संपली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आणखी काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे संपणार आहे.

निवडणुका जाहीर होईपर्यंत विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशही जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वी काढण्यात आले होते.

Parbhani: परभणीत शक्तिपीठ विरोधात रस्ता रोको

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा तसेच परभणीच्या सहजपूर जवळा या ठिकाणी पोलिस आणि महसूल प्रशासनाने केलेल्या दंडेलशाहीचा निषेधार्थ आज परभणी मध्ये उबाठा शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना किसान सभा तसेच इतर पक्ष आणि संघटनांबरोबरच शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे गंगाखेड परभणी महामार्गावरील शिंगणापूर फाट्यावर हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.

Pandharpur: संत गाडगेबाबांच्या जयंती निमित्ताने पंढरपुरात स्वच्छता अभियान

संत गाडगे बाबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पंढरपुरात नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छता अभियानामध्ये नगरपालिकेचे पदाधिकारी,अधिकारी व नागरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिमाता उद्यान,संतपेठ आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल आला आहे. बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी यात देण्यात आली आहे.

Sindhudurg: सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन ते दिवस वातावरणात बदल झाला असून कधी धुके तर कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच काल सायंकाळी फोंडाघाटासह परीसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. आजही सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उकाडा वाढला आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका आंबा काजू पिकांना बसण्याची शक्यता असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे

Nagpur: नागपुरात अवकाळी पाऊस; शेकडो पोती धान्य भिजलं

नागपूरात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो पोती धान्य भिजलं

एपीएमसी कळमना मार्केटमध्ये उघड्यावर असलेलं धान्य भिजलं

अवकाळी पावसाचा अंदाज असतानाही मार्केट प्रशासनाने धान्याचे पोती उघड्यावर ठेवली होती

उघड्यावर असलेलं धान्य भिजल्याने मोठं नुकसान

Yavatmal: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

अवकाळी पावसाचा गहू या पिकाला फटका, यवतमाळच्या महागाव तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपलं

महागाव तालुक्यातील कोंदरी,वाकण या परिसरातील गहू या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान

रात्री दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र शिवारात दिसून येते

Hingoli: हिंगोलीत पोलिस शिपाई चालक पदासाठी आले उच्च विद्याविभूषित तरुण

हिंगोलीत पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आज पोलीस शिपाई चालक पदासाठी मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे, पोलिसांच्या वाहनांवर चालक पदासाठी हिंगोलीत 32 जागा आहेत त्यासाठी तेरा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत विशेष म्हणजे पोलीस शिपाई चालक पदासाठी चक्क उच्च विद्या विभूषित असलेल्या तरुणांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे या मध्ये बी टेक एम टेक बीएससी ऍग्री कॅम्पुटर इंजिनियर बी एच एम एस डॉक्टर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Badlapur: बदलापूर अंडाशय रॅकेट प्रकरणी बडे मासे गळाला लागणार?

बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी मोठी माहिती समोर येतीय. या प्रकरणातील बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी ठाणे बदलापूर, विठ्ठलवाडी, वांगणी परिसरात छापे टाकून 10 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठा जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. आता ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती. या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे. याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

Sindhudurg: फोंडाघाट परिसरात अवकाळी पाऊल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन ते दिवस वातावरणात बदल झाला असून कधी धुके तर कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच काल सायंकाळी फोंडाघाटासह परीसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली. हवेत सुद्धा चांगलाच गारवा निर्माण झाला होता. आजही सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उकाडा वाढला आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका आंबा काजू पिकांना बसण्याची शक्यता असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे

Praniti Shinde: संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊन आम्ही राजकारणात आलोय- प्रणिती शिंदे

गेल्या वर्षभरात निवडणुका आणि आचारसंहितेतच वेळ गेला.मात्र आता विकासकामांची उणीव भरून काढणे आणि प्रत्यक्ष कामाला गती देणे हेच आमचे तत्त्व,प्रथा आणि परंपरा आहे. कोणतेही काम असो,आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून लोकशाही पद्धतीनेच कारभार करतोय. संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊन आम्ही राजकारणात आलो.आज फार कमी लोक आहेत जे सविधान वाचवण्याचं काम करत आहेत,असं वक्तव्य काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमात त्या बोलत होत्या. खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून सोलापूर शहरातील अरविंद धाम येथे 10 लाखांचा काँक्रिट रस्ता पूर्ण करण्यात आला आहे.

Latur: लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी

लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे, जिल्ह्यातल्या उदगीर जळकोट निलंगा या भागात रात्री पाऊस झाला,सकाळी लातूर शहरात अर्धा तास पाऊस झाला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात देखील बदल झालाय, दरम्यान या पावसामुळे काढणीला आलेल्या हरभरा ज्वारी गहू या पिकांसह आंबा आणि द्राक्ष फळबागाचे नुकसान झाले आहे

Yavatmal: यवतमाळमध्ये वीस दिवसात पाणी पातळीत साडेसात टक्क्यांनी घट

फेब्रुवारी महिना संपत असतानाच यवतमाळ जिल्ह्याचा पारा वाढू लागल्याने पाण्याची मागणी वाढली आहे वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील 74 प्रकल्पांमधील पाणी पातळी अवघ्या 20 दिवसात साडेसात टक्क्यांनी खाली आलीये सध्या या प्रकल्पांमध्ये सरासरी 66.78% जलसाठा उपलब्ध आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा 13 टक्क्यांनी अधिक असल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे.

Indapur: सकल हिंदू समाजाकडून आज इंदापूर बारामती दौंड बंदच आवाहन

सकल हिंदू समाजाकडून आज इंदापूर दौंड आणि बारामती बंदच आवाहन करण्यात आले आहे .भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर हे बंदच आवाहन करण्यात आले आहे.भिगवण प्रकरणातील आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई यावी याशिवाय या प्रकरणातील जे जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शिवाय संबंधित तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावं आणि सुरू असलेल्या अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी हा बंदअप करण्यात आलाय.

Nashik: कुंभमेळ्यासाठी नाशिककरांवर आणखी २०० कोटींचं कर्ज, महापालिकेचा ग्रीन बॉण्ड लवकरच बाजारात

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका पुन्हा एकदा कर्ज उभारणीच्या तयारीत आहे. महापालिकेच्या २०० कोटी रुपयांच्या हरित कर्जरोख्यांना ‘सेबी’कडून अंतिम मंजुरी मिळाल्याने पुढील आठवड्यात हा ग्रीन बॉण्ड इश्यू बाजारात आणला जाणार आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांनाही हे बॉण्ड खरेदी करता येणार आहेत. कुंभमेळ्याच्या कामांसाठी यापूर्वीच २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉण्ड उभारण्यात आले होते. त्यावर ७.८० टक्के व्याजदर देण्यात येत आहे. आता त्याच धर्तीवर आणखी २०० कोटी रुपयांचे हरित कर्जरोखे काढले जाणार असल्याने एकूण कर्जाचा आकडा ४०० कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे आगामी काही वर्षे महापालिकेला भांडवली कामांपेक्षा कर्जफेडीवरच अधिक भर द्यावा लागणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. या नव्या ग्रीन बॉण्डमधून मलनिस्सारण योजनेअंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे उभारणे आणि मुकणे धरण थेट पाइपलाइन विस्तारित योजनेसाठी निधी वापरण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून १३ टक्के प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून सुमारे २६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ महापालिकेला मिळणार आहे. आज महापौर आणि आयुक्त पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा करणार आहेत. मात्र प्रश्न असा की कुंभाच्या तयारीसाठी घेतले जाणारे हे कर्ज भविष्यात नाशिककरांच्या खांद्यावर किती आर्थिक ओझं वाढवणार? कुंभाची तयारी की कर्जाचा डोंगर ? यावर आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.

Pune: पुणे बाजार समिती चौकशी अहवालावर नाराजी सविस्तर अहवालाचे आदेश

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराबाबत सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल त्रोटक व मोघम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या आदेशानुसार नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर पणन संचालक संजय कदम यांनी नाराजी व्यक्त केली.

शासन पत्रातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश

जिल्हा उपनिबंधक, सभापती व सचिवांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडल्यानंतर जयकुमार रावल यांनी फुल बाजारातील परवाने व विना निविदा ठेके रद्द करण्याची घोषणा केली होती.

Pune: पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले.

या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत पुण्यामध्ये मुळा मुठा नदीच्या विविध घाटांवर विशाल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

1600 हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.आमदार अमित गोरखे आक्रमक पवित्र घेणार असून त्यांच्या समर्थक व समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ ब क ड नुसार वर्गीकरण करावी अशी मातंग समाजाची मागणी आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय न झाल्याने समाजात नाराजी असून अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.धाराशिव मधूनही मोठ्या प्रमाणात समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.आमच्या मागण्यासाठी अधिक तिव्र व आक्रमक

आंदोलन करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलाय

खासदार बळवंत वानखडे उतरले रस्त्यावर

“केंद्र सरकार जाणीवपूर्वक मनरेगा कायदा कमकुवत करून तो इतर योजनांमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करत आहे.असा आरोप काँग्रेस पक्षाचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे,ग्रामीण व आदिवासी मजुरांच्या हक्काची कायदेशीर हमी काढून घेण्याचा हा डाव असून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील ४० हजार मजुरांचे आयुष्य या योजनेवर उभे आहे. मजुरांच्या हक्कावर कुठलाही घाला घातला तर रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष उभारू,असा थेट इशारा खासदार बळवंतराव वानखडे यांनी देत मेळघाट मध्ये खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात ‘मनरेगा बचाव यात्रा काढण्यात आली यावेळी शेकडो मजूर या यात्रेत सहभागी झाले होते...यावेळी खासदार वानखडे यांनी मजुरांच्या रांगेत बसून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या न्याय्य हक्कासाठी संसदेपासून रस्त्यापर्यंत लढण्याची ठाम ग्वाही त्यांनी मजुरांना दिली. मनरेगा मजुरी किमान ४०० रुपये प्रतिदिन करण्यात यावी आणि १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी प्रभावीपणे कायम ठेवावी. केंद्र सरकार राज्यांवर आर्थिक बोजा टाकून योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला,

दुपारी १ ते हडपसर ते दिवेघाट रस्ता बंद राहणार

वाहतूक शाखा पोलिसांनी काढले आदेश

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान, दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी उद्या ब्लास्टिंग करण्यात येणार आहे.

या कामामुळे दुपारी १ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

तरी या कालावधीत नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांनी केले...

निगडे बुद्रुक येथे विहिरीत पडलेल्या बछड्यास वनविभागाकडून जीवदान

निगडे बुद्रुक (ता.राजगड)येथील शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बछड्यास वाचविण्यात यश आले असल्याची माहिती राजगड वन विभागाकडून देण्यात आली. बावधन येथील प्राणी उपचार केंद्रातील रेस्क्यू टीमच्या सहाय्याने बछड्यास विहिरीतून वर काढण्यात आले.

संभाजीनगरमध्ये राडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला एका दारुड्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सोमनाथ मुरलीधर गिरी असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅफिक पोलिस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर ड्युटी करीत होते. त्यावेळी दुचाकीस्वार सोमनाथ हा डिव्हायडर जवळून गाडी चालवत होता. त्यास थांबवल्यावर तो दारू पिल्याचे आढळले. चौकशी सुरू केल्याने त्याने हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला दोन दिवसात बघून घेतो अशी धमकीही दिली. खरात यांच्या अंगावर हात उचलला. त्याने पत्नीला बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी वाद सुरू केला. शिवीगाळ करीत लोटालोट केली आणि फिर्यादीला चापट मारली. सोमनाथ हा रस्त्यावर जाऊन झोपला आणि वाहतुकीला आडथळा निर्माण केला. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पुंडलिकनगर, दामिनी पथक बोलावले. रस्त्याने जाणाऱ्यांनीही पती-पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिस आल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव,  हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा चौकात तासभर रास्ता रोको

कबनूर इथ भाजी - मंडईशेजारी लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या फलकाबाबत एका महिलेने अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आल्यानंतर रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com