Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: राज्याचा अर्थसंकल्प कधी? लाडक्या बहि‍णींना कधी मिळणार २१०० रुपये? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने दिले आहे. दरम्यान हे २१०० रुपये अर्थसंकल्पानंतर देण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत सध्या तरी १५०० रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले आहेत. अद्याप लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजूनही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. राज्याचे अर्थसंकल्प कधी सादर होणार, महिलांना पैसे कधी मिळणार, असे अनेक प्रश्न अनेक महिलांना पडले आहेत.

राज्याचं अर्थसंकल्प कधी सादर होणार?

लाडकी बहीण योजनेतील वाढीव हप्त्याची वाट महिला बघत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळू शकतात. राज्याचे अर्थसंकल्प ३ मार्च रोजी सादर होऊ शकतो. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली होती. दरवर्षी १ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केले जाते. अर्थमंत्री अजित पवार यावर्षी राज्याचे अर्थसंकल्प सादर करतील.

अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा होऊ शकतात. यात लाडकी बहीण योजनेबाबतही मोठी घोषणा केली जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो. महिला व बालविकास विभागाने अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर यावर निर्णय घेतला, असं सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार का?

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे. लाडकी बहीण योजना बंद असल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उलट आम्ही महिलांना अधिक मदत करण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मिळेल दिलासा

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT