Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी वाढवणार दारुवर टॅक्स? तूट भरुन काढण्यासाठी सरकारची धडपड,VIDEO

ladki bahin yojana effect on liquor rates : आता बातमी आहे तळीरामांच्या खिशाला कात्री लागण्याची....लाडक्या बहीण योजनेचा थेट फटका तळीरामांना बसणार आहे.. हा फटका कसा बसणार आहे आणि तिजोरीवर किती महसूली तूट आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट....
ladki bahin yojana effect
liquor rates Saam tv
Published On

लाडकी बहीण योजनेमुळे आता मद्यपींच्या खिशाला कात्री लागणार आहे... कारण महसुल वाढीसाठी दारुवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरु असल्याचं समोर आलंय..राज्य सरकारने महसूल वाढीसाठी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलीय. या समितीने काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

ladki bahin yojana effect
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीमुळे शेतकऱ्यांना फटका, मराठवाड्यात ठिबक सिंचन अनुदान थकलं

दारुचा टॅक्स, लाडकीचा हप्ता

राज्याच्या तिजोरीत 13 हजार 754 कोटींची महसूली तूट

मद्यविक्री आणि परवान्यातून 40 हजार कोटींचा महसूल

जास्तीचे मद्य परवाने देऊन महसूल वाढवण्याच्या हालचाली

ladki bahin yojana effect
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा बळीराजाला फटका? लाडक्या बहिणीमुळे सिंचन योजनेचं अनुदान थकलं

निवडणुकीच्या काळात सरकारने लाडकी बहीण, नमो शेतकरी सन्मान योजना, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या आहेत. तसंच भांडवली खर्चाच्या माध्यमातून राज्यावर तब्बल 7 लाख 82 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर तयार झालाय..

मात्र कोणत्या योजनेचा तिजोरीवर किती भार पडतोय? पाहूयात...

सरकारी योजनांमुळे तिजोरीत खडखडाट?

लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटींची आवश्यकता

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5500 कोटी

शिवभोजन आणि आनंदाचा शिधा योजनेसाठी 1300 कोटी

ladki bahin yojana effect
Ladki Bahin Yojana: वर्ध्यातील ३२०० लाडक्या बहिणी कारच्या मालकीण; जिल्ह्यातील बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार

राज्याच्या तिजोरीवरील योजनांचा आर्थिक ताण पुढील काही वर्षे राहणार असला तरी योजना बंद न करता आर्थिक शिस्तीबाबत कठोर निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी सकाळ सन्मान कार्यक्रमातून दिलेत...

सध्या विदेशी मद्यावर 300 टक्के, देशी मद्यावर 213 तर बिअरवर 235 टक्के कर लावण्यात येतो.. मात्र आता लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांचा ताण तिजोरीवर आल्याने मद्यावरचा कर आणखी वाढवण्याची शक्यता आहे.. त्यामुळे सरकार तळीरामांचा खिसा किती रिकामा करणार? हे अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com