Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीमुळे शेतकऱ्यांना फटका, मराठवाड्यात ठिबक सिंचन अनुदान थकलं

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या ठिंबक सिंचन योजनेचे अनुदान थकलं आहे.
Farmer
Farmer
Published On

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आता बळीराजालादेखील फटका बसलेला आहे.मराठवाड्यात ठिबक सिंचनचं अनुदान थकलं आहे. त्यामुळे बळीराजाच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. लाडकी बहीण योजनेला लागलेल्या निधीमुळे शेतकऱ्यांना हा फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे. (Ladki Bahin Yojana)

Farmer
Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडक्या बहि‍णींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता; समोर आली मोठी अपडेट

मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारे ठिबक सिंचनचं अनुदान आता थांबवले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान थकलं आहे. निधी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न कृषी विभागासमोर आहे. फक्त संभाजी नगरमध्येच ५ कोटींपेक्षाही जस्त अनुदान थकलं आहे.

अनेक शेतकऱ्यांनी स्वतः चे पैसे खर्च करुन ठिबक सिंचन बसवले आहे. मात्र, अजूनही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत.त्यामुळे लाडक्या बहि‍णींमुळे बळीराजालादेखील फटका बसला आहे.

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. याचाच फटका इतर अनेक योजनांना बसत आहे. विकासकामे रखडली आहे.

Farmer
Ladki Bahin Yojana : लाडकींचा पंचनामा! लाभार्थी महिलांचे उत्पन्न, कागदपत्रे, जमीन तपासणार

विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वापरला गेला. इतर अनेक योजनांसाठी, कामांसाठी असलेला निधीदेखील या योजनेसाठी वापरला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्या त्या विभागांमध्ये निधी उपलब्ध नाही आहे. ठिबक सिंचन, वेगवेगळ्या अवजारांसाठी मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अनुदानासाठी अर्जदेखील भरले आहेत.परंतु अनुदान अद्याप जमा झालेले नाहीत.

Farmer
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'दे धक्का'; अंगणवाडी सेविकांकडून छाननी सुरू, लाखो अर्ज बाद होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com