Government Job: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Nashik Municipal Corporation Recruitment: नाशिक महानगरपालिकेमध्ये डॉक्टर पदासह अनेक पदांसाठी भरती होणार आहे. २०४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Nashik: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा  १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?
Saam Tv
Published On: 

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. नाशिक महानगर पालिकेमध्ये २०४ पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. नाशिक महानगर पालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १८ संवर्गातील २०४ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या रिक्त २०४ पदांसाठी मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इच्छुकांना २५ नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत, वैद्यकीय अधिकारी, विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम आणि तंत्रज्ञ अशी विविध पद भरली जाणार आहेत. २५ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत असून २ डिसेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. शल्यचिकित्सक, स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग, क्ष-किरण, बधिरीकरण, त्वचारोग आणि मानसोपचार तज्ज्ञ या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १,१०,००० रुपये इतके मानधन मिळणार आहे.

Nashik: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा  १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?
Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

तर, या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ७५,००० रुपये मानधन मिळेल. स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक व संगणक ऑपरेटर पदांसाठी निवड झालेल्यांना दरमहा २३,४५५ रुपये मानधन दिले जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत, स्टाफ नर्स पदाची ७९ जागा, ए.एन.एम पदाची ५७ जागा, वैद्यकीय अधिकारी पदाच्या १५ जागा, मिश्रक पदाच्या १५ जागा, संगणक ऑपरेटर पदाच्या १० जागा, इतर तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञ पदाच्या २८ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

Nashik: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा  १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?
Bank Job: सरकारी बँकेत मिळवा नोकरी! 1100 पदांसाठी भरती, महिन्याला कमवा 93,000 रुपये

या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या शेवटच्या वर्षाचे गुण (५० टक्के) आणि मुलाखत (५० टक्के) या १०० गुणांच्या आधारे केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीला नियुक्ती ६ महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मनपाच्या https://nmc.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. तर आवश्यक कागदपत्रांसह सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा  १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?
Government Job : सरकारी नोकरीसाठी २ मुलांची अट संपली! पण सरकारचा नवा नियम, जाणून घ्या महत्त्वाची अट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.