साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि कपड्यांवरील रक्ताचे DNA अन् 8 जणांना जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय

Shubham Dongre Killed Case Eight Accused Life Imprisonment: मावळच्या जांभूळ येथील शुभम डोंगरे खून प्रकरणात पाच वर्षांनंतर न्यायालयाचा मोठा निर्णय. साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि कपड्यांवरील रक्ताच्या डीएनए अहवालाच्या आधारे आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
MavalCrimeNews
MavalCrimeNewssaam tv
Published On: 

दिलीप कांबळे, साम टीव्ही

गाडी चालविण्यावरून झालेला किरकोळ वाद. त्यातून जमलेला जमाव. लोखंडी कोयते, लाकडी दांडके आणि दगडांनी केलेला जीवघेणा हल्ला आणि अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या. पाच वर्षांपूर्वी मावळ तालुक्यातील जांभूळ येथे घडलेल्या या थरारक हत्याकांडाचा अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. शुभम विलास डोंगरे खून प्रकरणात वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी जांभूळ येथील एक्झर्बिया सोसायटीजवळ कार चालविण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले होते.

MavalCrimeNews
Dhule Crime News | 4 वर्षांच्या भाच्याला सख्ख्या मामाने पाण्याच्या टाकीत बुडवून संपवलं! कारण काय?

शुभम डोंगरे याच्यावर कोयते, दांडके आणि दगडांनी वार करण्यात आले होते. या हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ प्रशांत गंभीर जखमी झाला होता. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला होता. मात्र, या खटल्यात जखमी साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे DNA अहवाल महत्त्वाचे ठरले. याच पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रत्येकाला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

MavalCrimeNews
मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अजय बारस्कररांनी पोलिसांना सोपवला जरांगेंच्या विरोधातील पुराव्याचा पेनड्राईव्ह

तसेच एका आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेणाऱ्यांना कायद्यापासून सुटका नाही, जमाव करून हल्ला केला तरी प्रत्येकाला आपल्या कृत्याची किंमत मोजावी लागते, हा स्पष्ट संदेश या निकालातून गेला आहे. पाच वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर शुभम डोंगरे कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील या बहुचर्चित खून प्रकरणाचा निकाल आता गुन्हेगारी प्रवृत्तींना कितपत धडा शिकवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.