Government Job : सरकारी नोकरीसाठी २ मुलांची अट संपली! पण सरकारचा नवा नियम, जाणून घ्या महत्त्वाची अट

Government Job Eligibility Rules : आता दोनपेक्षा जास्त मुले असलेले उमेदवारही मध्य प्रदेशात सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. तिसऱ्या अपत्यामुळे सुरू असलेल्या विभागीय चौकशा संपुष्टात येणार असून, अंतिम कारवाई झालेल्यांना मात्र दिलासा मिळणार नाही.
Mohan Yadav Government Changes Two-Child Eligibility Rule for Madhya Pradesh Government Jobs
Madhya Pradesh Government Removes Two-Child Norm for Government Jobs
Published On: 

Madhya Pradesh scraps two child rule for government jobs : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दोन मुलांच्या मर्यादेचा नियम रद्द करण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकारने घेतला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आता मध्य प्रदेशमध्ये दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारे नागरिकही सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. पण या शिथिलतेसोबत सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक अट लागू केली आहे. त्याचे पालन करणे प्रत्येक उमेदवारासाठी बंधनकारक असणार आहे.

सरकारी नोकऱ्यांमध्ये मागील २५ वर्षांपासून लागू असलेला २ अपत्यांचा निर्बंध मोहन यादव सरकारने रद्द केला आहे. मंदसौर येथील गांधी सागरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. सामान्य प्रशासन विभागाच्या नागरी सेवा नियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या निर्णयानंतर तिसरे अपत्य झाल्यामुळे कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले जाणार नाही. तसेच तीन मुले असलेल्या उमेदवारांना नवीन भरतीसाठी अपात्र ठरवले जाणार नाही. यामुळे केवळ शालेय शिक्षण विभागातील ३०,००० हून अधिक शिक्षकांना थेट दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना दिलासा?

हा निर्णय लागू होताच तिसरे अपत्य झाल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांविरुद्ध सध्या सुरू असलेली शिस्तभंगाची कारवाई किंवा विभागीय चौकशी तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणली जाईल. या नियमाअंतर्गत विविध विभागांमध्ये ८ ते १० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. बहुतांश तक्रारी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागांशी संबंधित आहेत. एकट्या वैद्यकीय शिक्षण विभागातील १२ तक्रारी निर्णयाच्या प्रतीक्षेत सामान्य प्रशासन विभागाकडे पोहोचल्या होत्या.

Mohan Yadav Government Changes Two-Child Eligibility Rule for Madhya Pradesh Government Jobs
राहुल गांधी भारताचे 'मीर जाफर', विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं हाच त्यांचा पॅटर्न; 'त्या' वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

त्या निर्णयाने काय फरक पडेल?

दोनपेक्षा जास्त मुले असल्यामुळे अपात्र ठरवल्या जाणाऱ्या उमेदवारांना शासकीय भरतीमध्ये सामील होणे सोपे होणार आहे. यापुढे फक्त मुलांच्या संख्येच्या आधारावर उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांमधून वगळले जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा जास्त मुले आहेत, ते विभागीय नियुक्ती आणि पदोन्नतीशी संबंधित पात्रतेसाठी या कारणास्तव अपात्र ठरणार नाहीत. पण यासाठी सुधारित नियमांनी याची पुष्टी करणे आवश्यक आहे. दोनपेक्षा जास्त मुले असणे हे गैरवर्तन मानणारी तरतूद काढून टाकली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याचा धोका नाहीसा झाला.

सरकारकडून कोणती अट

मध्य प्रदेश सरकारने हा नियम शिथिल करताना एक महत्त्वाची अटही घातली आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच कारवाई होऊन अंतिम आदेश पारित झाले आहेत किंवा ज्यांना २००१ सालानंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे, त्यांची प्रकरणं पुन्हा उघडली जाणार नाहीत. पण तिसरं अपत्य असल्याच्या कारणावरून ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सध्या शिस्तभंगाची कारवाई किंवा विभागीय चौकशी सुरू आहे, ती आता संपुष्टात आणली जाईल.

Mohan Yadav Government Changes Two-Child Eligibility Rule for Madhya Pradesh Government Jobs
Maharashtra Winter Session: "इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट..." मुख्यमंत्र्यांसमोरच मुनगंटीवार संतापले; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.