राहुल गांधी भारताचे 'मीर जाफर', विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं हाच त्यांचा पॅटर्न; 'त्या' वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

Rahul Gandhi Columbia University speech : राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यातील विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. गौरव भाटिया यांनी राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी करत जोरदार निशाणा साधला.
Rahul Gandhi
Rahul Gandhisaam tv
Published On: 

BJP Counterattack on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान कोलंबिया युनिव्हर्सिटीत बोलताना भारतातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवर जोरदार टीका केली. भारत सध्या मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असं विधान त्यांनी या कार्यक्रमात केलं.

राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करणं हा राहुल गांधींचा नेहमीचाच पॅटर्न बनला आहे, अशा शब्दांत भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी भारतविरोधी असल्याचं ते म्हणाले. परदेशात जाऊन देशाला बदनाम करणारी त्यांची निराधार आणि खोटी वक्तव्यं पाहून प्रत्येक भारतीयाला लाज वाटते, असं भाटिया म्हणाले. भाटिया यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट 'मीर जाफर'शी केली. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी ते आपल्या परदेशी मालकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विदेशात जातात, असा दावाही भाटिया यांनी केला.

भाटिया म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने लोकशाही, अर्थव्यवस्था, युवा सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर नवीन उंची गाठली आहे. तर भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही 'एक्स'वर पोस्ट करून राहुल गांधींना 'भारतविरोधी नेते' म्हणत निशाणा साधला होता. राहुल यांनी विद्यापीठात भारताची अर्थव्यवस्था आपत्तीग्रस्त असल्याचं सांगत आणि लोकशाहीविषयी चिंता व्यक्त करत देशाचा अपमान केल्याचा आरोप भंडारी यांनी केला होता.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी. आर. केशवन यांनीही एएनआयसोबत बोलताना राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात, तेव्हा ते आपल्या विषारी, खोट्या विधानांनी भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रकार करतात.

Rahul Gandhi
मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! पनवेल ते वसई थेट लोकल धावणार; ६९ किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

विरोधीपक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. १७ नोव्हेंबर रोजी ते न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात गेले होते. तिथे राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि शिक्षणतज्ञांशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी भारतातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि ढासळणाऱ्या आर्थिक परिस्थितीवर कठोर शब्दांत भाष्य केलं.

कार्यक्रमात सूत्रसंचालक लिडिया पोलग्रीन यांनी त्यांना भारतीय तरुणांमधील वाढत्या निराशा आणि असंतोषाबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, आज देशातील तरुणांना स्वतःचं भविष्य अंधारात दिसत आहे. त्यांना उज्ज्वल भविष्याची कोणतीही खात्री वाटत नाही. भारत सध्या एका मोठ्या आर्थिक संकटाच्या दिशेने जात आहे आणि बेरोजगारी खूप वाढली आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोरही अनेक मोठे प्रश्न उभे ठाकले आहेत, असं सांगत त्यांनी या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.