मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! पनवेल ते वसई थेट लोकल धावणार; ६९ किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी

पनवेल ते वसईदरम्यान ६९ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे कॉरिडॉरला रेल्वे बोर्डाच्या प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन कमिटीकडून मंजुरी मिळाली आहे. १७ स्थानके आणि २,७११ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला अद्याप नीती आयोग आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
Mumbai Local Train Lifeline
Passengers travel in a crowded Mumbai local train amid growing concerns over safety, security lapses, and rising incidents of misconduct.saam tv
Published On: 

नवी मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. पनवेल आणि वसई-विरार या दोन महत्त्वाच्या उपनगरांना जोडणाऱ्या ६९ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे कॉरिडोअरला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. सध्या पनवेलहून वसईला जाण्यासाठी प्रवाशांना दादर किंवा कुर्ला स्थानकावर जाऊन लोकल बदलावी लागते. मात्र, या नव्या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांची मोठी दगदग वाचणार आहे.

प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये:

एकूण लांबी: ६९ किलोमीटर (ज्यामध्ये २८ किलोमीटरचा उन्नत मार्ग म्हणजेच इलेव्हेटेड स्ट्रेच असणार आहे).

स्टेशन्सची संख्या : या मार्गावर एकूण १७ रेल्वे स्थानके असणार आहेत.

अंदाजित खर्च: या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे २,७११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यंत्रणा: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. हा प्रकल्प 'MUTP-3B' अंतर्गत येत आहे.

हा मार्ग का गरजेचा आहे?

सध्या पनवेल आणि वसई-विरार दरम्यान थेट लोकल ट्रेनची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. प्रवाशांना कुर्ला, दादर किंवा इतर स्थानकांवर जाऊन गाड्या बदलाव्या लागतात. नवी मुंबई, भिवंडी आणि वसई भागात राहूल-लोकसंख्या वेगाने वाढत असून तिथे व्यावसायिक आणि औदयोगिक विकासही वेगाने होत आहे. या प्रकल्पामुळे या सर्व भागांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच वाढवण पोर्ट (पालघर जिल्हा) आणि इतर उदयोन्मुख ग्रोथ सेंटर्सना जोडण्यासाठी देखील हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

Mumbai Local Train Lifeline
हृदयद्रावक! मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावमध्ये हळहळ

सध्या मंजुरीची स्थिती काय आहे?

रेल्वे बोर्डाकडून (प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन कमिटी) प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

राज्य सरकारने देखील या प्रकल्पाला तत्त्वतः (In-principle) मंजुरी दिली आहे.

सध्या हा प्रकल्प नीति आयोग आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या (Union Finance Ministry) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या दोन महत्त्वाच्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष टेंडर मागवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.