

कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याचं समजल्यानंतर ते लवकर नियंत्रणात आणण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधू लागतात. पण कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा कमी होणं ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे केवळ 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कमी होईल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. घाईघाईने कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न करणं आरोग्यासाठीही चांगलं नाही.
खरं तर, चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी आणि रोजच्या जीवनशैलीत योग्य बदल केले तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. रक्तवाहिन्यांमध्ये साचणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करण्यासाठी आहारात कोणते 4 बदल करावेत, ते जाणून घेऊया.
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असतं. त्यामुळे लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही लिंबू पाणी मदत करू शकतं, असं सांगितलं जातं.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाणं फायदेशीर ठरू शकतं. ओट्समध्ये विरघळणारे फायबर असतं. हे फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होण्यास मदत होऊ शकतं.
दररोज आहारातून 5 ते 10 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त विरघळणारं फायबर घेतल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नाश्त्यात ओट्सचा समावेश करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फायबर असलेल्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. सफरचंद, नाशपती, राजमा आणि ब्रसेल्स स्प्राउट्स यांसारख्या पदार्थांमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतं. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश करता येतो. स्वयंपाक करताना या तेलाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. भाज्या करण्यासाठी किंवा रोजच्या स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल वापरता येतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.