राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टद्वारे पत्र लिहीत सामाजिक न्यायमंत्री तथा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लातूरमधील एका संस्थेच्या 25 कोटींच्या ट्रेनिंग सेंटर प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मंत्र्यांनी मुंबईतील खाजगी घरी बोलावून पाच कोटींची लाच मागितल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी
आपले सरकार हे भ्रष्ट्राचाराची खाण बनले आहे ..
राज्याची आणि जनतेची लूट खुलेआम सुरू आहे,
आपण काय करताय?
लहान कामांसाठी देखील मंत्री पैसे मागत आहेत,हे अराजक आहे!
लातूर येथील श्री नरसिंग उरगीर मला भेटले,
या आधी त्यांची व्यथा घेऊन ते सरकार दरबारी,लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटले
पण निकाल शून्य
केस अशी आहे:
श्री नरसिंग यांनी त्यांच्या
आरती सेवाभावी संस्था लातूर यांचे माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेन्टर उदगीर या साठी प्रस्ताव दिनांक 6 / 10 / 2025 रोजी समाज कल्याण मंत्रालयात सादर केला. पंचवीस कोटी रुपयांचा परिपूर्ण असा हा प्रस्ताव. तो प्रस्ताव अद्याप समाज कल्याण मंत्री महोदयांनी मंजूर केला नाही. त्याचे कारण मंत्रीमहोदयानी प्रस्तावाच्या २०% म्हणजेच साधारण पाच कोटीची लाच मुंबईतील ७२ व्या मजल्यावर खाजगी घरी बोलवून स्वतः मागितली, ती रक्कम दिली नसल्यामुळे आपला प्रस्ताव अद्याप मंजूर केला नाही असे श्री नरसिंग यांचे म्हणणे आहे!
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने पाच कोटी रुपयांची लाच मागितली जाते
ज्या अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात मोठे योगदान आहे!
देवेंद्रजी, हा असला दलितोद्धार काय कामाचा?
श्री नरसिंग यांची कहाणी राज्यातील प्रत्येक माणसाची व्यथा आहे!
असे राज्य सरकार बुडालेले बरे!
(आज नरसिंग उरगिरकर माध्यमाना भेटतील,त्याना अडवले नाही तर)
आरोपांची सविस्तर माहिती संजय राऊत यांनी पोस्टद्वारे केली आहे. आता यावर मंत्री संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.