Ladki Bahin Yojana: पगार नाही, लाडकी बहिण सर्वेक्षणाला विरोध, राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी सेविकांचा मोठा निर्णय

Anganwadi Sevika On Ladki Bahin Yojana: राज्य सरकारकडून या लाडक्या बहिणीचा फेर सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाला विरोध करत आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasaam Tv
Published On

चेतन व्यास, साम टीव्ही

महाराष्ट्र सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी आणली होती. या योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात आले. मात्र आता राज्य सरकारकडून या लाडक्या बहिणीचा फेर सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याकरिता अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहे मात्र अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाला विरोध करत आहे. यासह अंगणवाडी सेविकांची पगारवाढ आणी केंद्र सरकारच नुकतच आलेलं बजेटचा विरोध करण्यासाठी आज अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलाय. आयटकचे दिलीप उटाने यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: त्या ५ लाख महिलांना पैसे मिळणार की नाहीत? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्याची निवड करताना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. आता त्यांनाच फेर सर्वेक्षण करून ज्यांच्याघरी कार, दुचाकी आणी चार एकर शेती आहे अश्या लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश केले आहे. निवड केलेल्या लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर लाभापासून वंचित केले तर गावकऱ्यांचा विरोध होईल आणी अंगणवाडी सेविकांबाबत वाद निर्माण होऊ शकते यामुळे या सर्वेक्षणाला अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे. राज्यात असलेल्या दोन लाख अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाचे काम करणार नसल्याचं मंत्रिना सांगण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीमुळे शेतकऱ्यांना फटका, मराठवाड्यात ठिबक सिंचन अनुदान थकलं

सोबतच सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पगारवाढ व दरमहा पेन्शन देण्यात यावी या मागण्यासह केंद्र सरकारच्या बजटचा विरोधही या मोर्चात करण्यात आला.शहराच्या मुख्य मार्गातून निघालेल्या या मोर्चाचा जिल्हा परिषद येथे समारोप झाला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकींचा पंचनामा! लाभार्थी महिलांचे उत्पन्न, कागदपत्रे, जमीन तपासणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com