Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहि‍णींवर २१ हजार कोटींचा खर्च; २० महिन्यापासून ₹१५०० घेतले

Ladki Bahin Yojana 21300 Crore Spend On Ineligible Women: लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारवर २१३०० कोटींचा आर्थिक भार पडला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारवर २१३०० कोटींचा भार

अपात्र लाडक्या बहिणींसाठी १,०६५ कोटी रुपये खर्च

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास ७२ लाख महिला अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेच्या २.४ कोटी लाभार्थी महिला होत्या. त्यानंतर आता या महिलांची संख्या १ कोटी ७५ लाख झाली आहे. लाखो महिला अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. दर महिन्याला १५०० रुपये घेतले आहेत. यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.

सरकारवर २१,३०० कोटींचा भार

लाडकी बहीण योजनेतून ७२ लाख महिला अर्ज बाद केले आहेत.या महिलांनी दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. मागच्या २० महिन्यांपासून महिला लाभ घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ पासून अपात्र महिलांना १,०६५ कोटी रुपये दिले आहेत. यामुळे सरकारवर २१,३०० कोटींचा आर्थिक भार पडला आहे.

महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये योजना सुरु केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहे. या निकषात पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ सुरु ठेवण्यात आला आहे. पडताळणीमध्ये अपात्र महिलांची माहिती समोर आली. तेव्हापासून त्यांचा लाभ बंद झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? (Ladki Bahin Yojana Eligibility Criteria)

लाभार्थी महिला २१ते ६५ वयोगटातील असावी. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला शासकीय कर्मचारी नसाव्यात. महिला किंवा त्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. याचसोबत महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत नसावेत. जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तरच तुमचा लाभ सुरु राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाही, 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

SCROLL FOR NEXT