ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

Government Scheme: सरकारने पोखरा प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिला बचत गटांना नवी योजना आणली आहे. शेती अवजार बँकांच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. यातून २४ लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाईल.
Government Scheme:
Government’s new scheme empowers rural women with agriculture equipment and financial support.saam tv
Published On
Summary
  • ग्रामीण महिलांसाठी सरकारची नवी योजना

  • २४ लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ

  • कृषी अवजार बँक स्थापन करण्यास प्रोत्साहन

लाडकी बहीण योजनेनंतर सरकारनं आता ग्रामीण भागातील महिलांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. या योजनेतून महिलांना मोठी आर्थिक लाभ होणार आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला चालना देताना महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारनं नवी योजना आणली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गावपातळीवर कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे.

Government Scheme:
काय आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

या योजनेतून शेतकऱ्यांना (Farmer)आधुनिक यंत्रसामग्री सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच महिला बचत गटांसाठीही उत्पन्नाचे नवं साधन निर्माण होणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिला बचतगटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कमाल २४ लाख रुपयांपर्यंत मिळेल. ग्रामीण भागात शेतीसाठी मजुरांची कमतरता तीव्रतेने जाणवत असते.

Government Scheme:
Ration Card Update: गॅस टंचाईत दिलासा! रॉकेल वाटप सुरू होणार? रेशनकार्ड लवकर अपडेट करा नाहीतर...; घरबसल्या करा प्रोसेस

परिणामी, शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढत आहे. लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. ही समस्या लक्षात घेतल्यानंतर भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी (Agriculture) अवजार बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रे गरजेनुसार उपलब्ध होतील. पेरणी, लावणी आणि कापणीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये ही यंत्रे उपयुक्त ठरणार आहेत.

अर्ज प्रक्रिया आणि नोंदणी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला बचत गटांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना बँक खात्याचे तपशील तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागेल. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय.

गावपातळीवर उपलब्ध होणार आधुनिक यंत्रे

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाईन हार्वेस्टर, फवारणी पंप यांसारखी विविध आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे. स्थानिक पीक पद्धतीनुसार आवश्यक यंत्रांची निवड करण्याची मुभाही देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com