Ladki Bahin Yojana: ७२ लाख अपात्र; १ कोटी ७५ लाख महिलांना मिळणार ₹१५००; लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana Verification Status: लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आले आहे. या योजनेतून आतापर्यंत ७२ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

आतापर्यंत ७२ लाख महिलांना योजनेतून वगळले

फक्त १ लाख ७५ हजार महिलांना मिळणार लाभ

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जवळपास पंधरा महिने झाले आहे. या योजनेत सुरुवातीला २.४ कोटी लाभार्थी होते. यानंतर अपात्र ठरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. याचसोबत अनेक पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतला होता त्यांनाही वगळण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत तब्बल ७२ लाख अर्ज वगळण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

७२ लाख महिलांना योजनेतून वगळले (Ladki Bahin Yojana 71 Lakh Women Ineligible)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले होते. यामध्ये लाखो महिलांनी केवायसी केले नाही तर अनेक महिलांच्या केवायसीत अडचण आहेत. एकूण ७२ लाख महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आता १ कोटी ७५ लाख महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत जुलै २०२४ पासून लाभ देण्यास सुरुवात झाली होती. २ कोटी ४७ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळत होता. त्यानंतर सरकारने प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये निकषामध्ये न बसणाऱ्या सर्व महिलांना वगळण्यात आले. मागच्या १५ महिन्यात एकूण ७२ लाख महिलांना वगळण्यात आले आहे, याबाबत लोकसत्ताने वृत्त दिलं आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

लाडक्या बहिणींच्या केवायसीबाबत अपडेट

लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदत आता वाढवून देण्यात आली आहे. आता लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती ३० एप्रिलपर्यंत करु शकतात. तुमच्याकडे १ महिन्याची मुदत आहे. त्यामुळे या कालावधीत लाडक्या बहिणींनी केवायसी करायची आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी काय करायचं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com