Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी काय करायचं?

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पात्र असून, ईकेवायसी करुनदेखील पैसे जमा झाले नसतील तर महिलांनी या ठिकाणी तक्रार करायची आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

हप्ता जमा न झाल्यास काय करावे?

पात्र असूनही पैसे आले नाही तर इथे करा तक्रार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी केवायसी करुनदेखील पैसे जमा झाले नाहीत. महिला पात्र आहेत, केवायसीदेखील व्यवस्थित केली परंतु त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. आता या महिला तक्रार करु शकतात.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची बातमी! लाडक्या बहि‍णींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा न झाल्यास काय करावे? (Ladki Bahin Yojana Installment not Recieved then What to Do)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील ते तक्रार करु शकतात. महिला जर पात्र असतील केवायसीदेखील पूर्ण केली असेल तर त्या याबाबतची तक्रार देऊ शकतात. संबंधित महिलांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन याबाबत माहिती द्यायची आहे. तिथे तक्रार करायची आहे.

तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमच्या सर्व अर्जांची पडताळणी केली जाईल. यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही, केवायसी केली की नाही याबाबत माहिती घेऊन तुमचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल. महिलांना पुन्हा एकदा १५०० रुपये मिळतील. त्यामुळे तुम्ही तक्रार करु शकतात.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची बातमी! लाडक्या बहि‍णींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती (Ladki Bahin Yojan eKYC Update)

दरम्यान, अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. या महिलांनी पुन्हा एकदा केवायसी करुन त्यात दुरुस्ती करायची आहे. जर तुम्ही दुरुस्ती केली असेल तरीही तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या योजनेत केवायसीत दुरुस्ती केलेल्या महिलांना ३ महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. यासाठी ३१ एप्रिलपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यानंतर महिलांना एकत्र हप्ता दिला जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com