Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana March Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एप्रिल महिना सुरु झाला तरी मार्चचे पैसे जमा झाले नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

मार्चचा हप्ता कधी येणार?

एप्रिल सुरु झाला तरीही पैसे जमा झालेले नाही

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता येण्यास उशिर झाला होता. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यानंतर आता मार्चच्या हप्त्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. लाडक्या बहि‍णींना मार्चचे १५०० रुपये कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मार्चचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana March Installment Date)

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता महिन्याच्या शेवटी येईल, असं वाटलं होतं. फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, मागच्या महिन्यात फक्त फेब्रुवारीचाच हप्ता जमा झाला. मार्चचा हप्ता आलाच नाही. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली. मात्र, आता महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

मार्चचा हप्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एप्रिलच्या १५ तारखेआधी पैसे खात्यात येऊ शकतात. अजूनही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २४ तास! लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम अन्यथा ₹४५०० रुपये विसरा

या महिलांना मिळणार ₹४५०० (Ladki Bahin Yojana These Women Will get 4500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केले आहे त्यांचाच लाभ सुरु राहणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसीत दुरुस्ती केली आहे त्यांना तीन महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतात. महिलांना ४५०० रुपये मिळू शकतात.हे पैसे कधी येणार याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची बातमी! लाडक्या बहि‍णींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com