Ladki Bahin Yojana  Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: अक्षय तृतीयेला खुशखबर मिळणार,लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट ₹१५०० जमा होणार?

Majhi Ladki Bahin Yojana April Month Installment Date: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे. दरम्यान, अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ९ हप्ते आले आहेत. त्यानंतर आता महिला एप्रिलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ६ एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील, असं वाटतं होतं. मात्र, रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान, आता अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीया आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, अशी माहिती समोर येत आहे. त्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीया आहे. त्यामुळे हा मूहूर्त साधून याच दिवशी पैसे येऊ शकतात. अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार? (When Will 2100 Rupees Recieve)

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. याचसोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनीही याबाबत माहिती दिली होती. जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहि‍णींना कधीही २१०० रुपये देऊ. याचाच अर्थ असा की येत्या ५ वर्षात लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये येऊ शकतात.

पैसे आले की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. पैसे क्रेडिट झाल्यावर तुमच्या फोनवर मेसेज येईल. याचसोबत तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन बॅलेंस चेक करु शकतात.ऑफलाइन पद्धतीने तुम्ही बँकेत जाऊन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात. बँकेत पासबुकवर एन्ट्री केल्यावर तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT