
संजय राठोड, साम टीव्ही
लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. लाडकी बहीण योजना सरकार डोईजड होऊ लागल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम महिना २१०० रुपयापर्यंत वाढवण्यात येणार होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी अद्याप रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लाडकी बहीण योजनेवरून करण्यात येणाऱ्या विरोधकांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
तुम्ही एवढे समोर बसले नसता तर या व्यासपीठाची शोभा वाढली नसती. खऱ्या अर्थाने इकडे पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत. इकडे लाडक्या बहिणी आहेत. लाडके शेतकरी आहेत. पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर आभार मानायला आपण निवडणुकीत भरभरून मतांचा वर्षाव केला.
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम सरकारने केले पाहिजे ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेंनी मनात ठेवली. कारण मला जाणीव आहे की, सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलो आहे. मी देखील त्या काळात माझ्या आईची तगमग पाहिली आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की, माझ्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील, तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस विरोधकांनी काहूर माजवलं. मला एका पैसे देणार नाही परत पंधराशे रुपयांमध्ये काय बहिणींना महिलांना काय भेटतं? काय विकत घेता येतं? कोर्टात पण गेले. कोर्टात योजना थांबवण्यासाठी मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं. सावत्र भावांना लक्षात ठेवा. जेव्हा येईल निवडणुका येते, तेव्हा लक्षात ठेवा
सावत्र भावांना लक्षात ठेवा. जेव्हा येईल निवडणुका येते, तेव्हा लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही 232 आमदार महायुतीचे आले, ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि इतिहास घडला.
युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांच्या योजना, शेतकरी सन्मान योजना, पिक विमा योजना... एकूण 45000 कोटी रुपयांच्या योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी दिल्या. शेतकरी, कष्टकरी, वारकरी, धारकरी माझ्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचे काम आपण पाहून विरोधकांचे डोळे पांढरे झाले.
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या. तुम्हाला मी सांगतो की, या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली आहे. या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.