Shocking : गुप्तधनासाठी गुप्तांगाचे पूजन, नंतर नको ते व्हिडिओ; पैशांचा पाऊस पाडण्यासाठी २०० तरुणींसोबत घाणेरडा खेळ

Shocking News : गुप्तधनासाठी गुप्तांगाचे पूजन केल्यानंतर तरुणींचे नको ते व्हिडिओ केले जायचे. टोळीने आतापर्यंत २०० तरुणींना जाळ्यात अकडवलं होतं.
Shocking News
Shocking News Saam tv
Published On

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. आंतरराज्यीय टोळी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घाणेरडा खेळ करत असल्याचं उघडकीस आलं आहे. या टोळीकडे २०० तरुणींचे अश्लील व्हिडिओ आढळले आहेत. पैशांचा पाऊस पाडणार, असे सांगून टोळी अनेकांना फसवत होती. टोळीने आतापर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केली आहे.

Shocking News
Mhada Lottery : म्हाडाच्या नव्या घरांची लॉटरी कधी निघणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून गरीब तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं. तंत्रक्रिया करताना कुटुंबातील लोकांना बाहेर उभे राहण्यास सांगितलं जायचे. त्यानंतर तंत्रक्रिया करताना तरुणींच्या गुप्तांगाची पूजन केलं जायचं. तंत्र क्रिया केल्यानंतर तरुणीसोबत काय केलं जायचं, हे त्यांनाही माहीत नाही. तंत्रक्रिया केल्यानंतर तरुणींचे अश्लील व्हिडिओ तयार केले जायचे. त्यांच्या व्हिडिओची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त जातोय.

Shocking News
Pune : रुग्णालयाचा हलगर्जीपणा? जुळ्या बाळांचा जन्म, पण मायेची सावली हिरावली; पुण्यातील धक्कादायक घटना

एका तरुणाचं अपहरण करून त्याच्यावर तंत्र क्रिया करून हत्या करण्यात येणार असल्याची सूचना पोलिसांना मिळाल्यानंतर टोळीचा भंडाफोड झाला. टोळीकडून रोख पैशांचं आमिष दिलं जायचं. या टोळीकडून गरीब कुटुंबांना लक्ष्य केलं जायचं. ही टोळी सांकेतिक (कोड) भाषेतून संवाद साधायची. तरुणींवर तांत्रिक क्रिया केल्यानंतर त्यांच्यासोबत घाणेरडा खेळ व्हायचा.

Shocking News
BJP Women Leader Died : भाजप महिला नेत्याच्या मृत्यूने खळबळ; पाय दुखल्याने रुग्णालयात दाखल केलं, इंजेक्शन दिल्यानंतर भयंकर घडलं

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष देऊन गरीब तरुण-तरुणींचं लैंगिक शोषण केलं जायचं. टोळीचं नेटवर्क दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये पसरलं आहे. पैशांचं आमिष देऊन टोळी लोकांची फसवणूक करत होती. आगरा या शहरात टोळीचं जाळं झपाट्याने वाढत होतं. पोलिसांनी टोळीतील सर्व आरोपींची अटक केली आहे. तर टोळीच्या इतर सदस्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून टोळी सक्रिय आहे. या टोळीने आतापर्यंत शेकडो लोकांना लक्ष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com