BJP Women Leader Died : भाजप महिला नेत्याच्या मृत्यूने खळबळ; पाय दुखल्याने रुग्णालयात दाखल केलं, इंजेक्शन दिल्यानंतर भयंकर घडलं

BJP Women Leader Died in hospital : भाजप महिला नेत्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. महिलेचा पाय दुखल्याने रुग्णालयात दाखल केलं. इंजेक्शन दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.
kanpur
hospital Saam tv
Published On

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भाजपच्या महिला नेत्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पाय दुखल्याने एका खासगी रुग्णालयात पोहोचल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान इंजेक्शन दिलं. त्यानंतर तब्येत बिघडली. काही तासानंतर महिला नेत्याने जीव सोडला.

महिला नेत्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चुकीचं इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महिला नेत्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी नर्सिंग होममध्ये एकच गोंधळ केला. रुग्णालयात गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

kanpur
waqf board amendment bill : वक्फ बिलात गैरमुस्लीम सदस्याची तरतूद नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण, VIDEO

भाजपच्या महिला नेत्याची मुलगी मुंबईत अभिनय करते. मुलगी देखील नातेवाईकांसोबत रुग्णालयात पोहोचली. भाजप महिला नेत्याच्या मृत्यूनंतर जाब विचारल्यानंतर नर्सिंग होमच्या स्टाफने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि भाजप आमदार घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तणावपूर्ण वातावरण शांत केलं.

kanpur
Affordable Healthcare : नागरिकांना अवघ्या १ रुपयांत मिळणार वैद्यकीय उपचार; जाणून घ्या संपूर्ण योजना एका क्लिकवर

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कानपूरच्या कल्याणपूरमधील अर्शिया रुग्णालयातील ही घटना आहे. भाजपच्या महिला नेत्या सुनीता शुक्ला पाय दुखल्याने त्यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची मुलगी तृप्ती आणि रिचा रुग्णालयात पोहोचल्या. तृप्ती मुंबईत फिल्म इंड्रस्ट्रीत काम करते.

सुनीता यांच्या म्हणण्याचे म्हणणं आहे की, 'आईच्या पायात दुखू लागल्याने रुग्णालयात पोहोचली. त्यावेळी रुग्णालतात कोणताही डॉक्टर नव्हता. रुग्णालयात कंपाऊंडर आणि नर्स होती. त्यांनी आईला थेट आयसीयूमध्ये दाखल केले. त्यांनी आईला एक इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर आईची तब्येत बिघडली. काही तासानंतर आईचा मृत्यू झाला.

kanpur
Share Market Today : डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स-निफ्टी धडाम; कोणते शेअर ठरले टॉप लुजर्स?

तृप्ती आणि रिचा यांनी आईच्या मृत्यूनंतर नर्सिंग प्रशासनाला प्रश्न उपस्थित केले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना मारहाण केली. गोंधळ झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि भाजप नेते पोहोचले. भाजप आमदार निलिमा कटिहार रुग्णालयात पोहोचल्या. तसेच पोलीस प्रशासनातील बडे अधिकारी देखील पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com