Kanpur Crime: भयंकर! हायवेवर महिलेचा विवस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह, दृश्य पाहून पोलिसही चक्रावले; तपास सुरु

Kanpur Women Death News: कानपूरमधील राष्ट्रीय महामार्गाला जोडलेल्या गुजैनी भागातील मुन्ना तिराहेच्या एलिव्हेटेड रोडवर या महिलेचा मृतदेह आढळून आला. रात्री या रस्त्यावरून अनेक वाहने गेली, मात्र रस्त्यात अज्ञात महिलेचा मृतदेह पडलेला कोणालाही दिसला नाही.
Kanpur Crime: भयंकर! हायवेवर महिलेचा विवस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह; दृश्य पाहून पोलिसही चक्रावले; अपघात की घातपात? तपास सुरु
Kanpur Women Death News:
Published On

Women Body Found In Kanpur Highway: उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या NH2 महामार्गावर एका महिलेचा नग्नावस्थेतील आणि शिर नसलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेचे हात- पायही तुटलेल्या अवस्थेत असून ही अत्याचार आणि हत्येची घटना असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरु आहे. या महिलेची ओळख पटवून ही हत्या आहे की अपघात? याबाबतचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Kanpur Crime: भयंकर! हायवेवर महिलेचा विवस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह; दृश्य पाहून पोलिसही चक्रावले; अपघात की घातपात? तपास सुरु
Maharashtra Politics: CM शिंदे, अजित पवारांमध्ये मध्यरात्री खलबतं! प्रफुल पटेल, उदय सामंतांचीही हजेरी; 'वर्षा'वरील बैठकीत काय ठरलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिल्ली हायवेवर एका तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या अंगावर एकही कपडा नसल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बलात्कार किंवा सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून ही माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

कानपूरमधील राष्ट्रीय महामार्गाला जोडलेल्या गुजैनी भागातील मुन्ना तिराहेच्या एलिव्हेटेड रोडवर या महिलेचा मृतदेह आढळून आला. रात्री या रस्त्यावरून अनेक वाहने गेली, मात्र रस्त्यात अज्ञात महिलेचा मृतदेह पडलेला कोणालाही दिसला नाही. सकाळी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. हा मृतदेह कोणाचा आहे आणि रस्त्याच्या मधोमध कसा पोहोचला हे कोणालाच माहीत नाही. मृतदेह पाहून कोणीतरी खून करून मृतदेहाचे शीर कापून रस्त्यावर फेकून दिले असावे, असा अंदाज आता बांधला जात आहे.

Kanpur Crime: भयंकर! हायवेवर महिलेचा विवस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह; दृश्य पाहून पोलिसही चक्रावले; अपघात की घातपात? तपास सुरु
Indore Crime: भयंकर घटना! फिरायला गेलेल्या लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला; बंदूकीचा धाक दाखवत मैत्रिणीवर सामूहिक अत्याचार

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला, यावेळी समोरचे दृश्य पाहून पोलिसही हादरुन गेले. या महिलेच्या मृतदेहाचे शीर कापलेले होते, अंगावर एकही कपडा नव्हता तसेच तरुणीचे डोकेही दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या तरुणीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तसेच बलात्कारानंतर हत्या केली गेली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच नेमकं काय घडलंय हे समजू शकेल.

Kanpur Crime: भयंकर! हायवेवर महिलेचा विवस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह; दृश्य पाहून पोलिसही चक्रावले; अपघात की घातपात? तपास सुरु
Sharad Pawar News: झेड प्लस सुरक्षा घेतो, पण 'या' अटी पूर्ण करा', शरद पवारांचे केंद्र सरकारला पत्र; काय मागणी केली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com