Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढलं! या महिलांना मिळणार नाही मार्चचा हप्ता; अर्थसंकल्पानंतर मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता जमा केला आहे. त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. दरम्यान, काही महिलांना मार्चचा हप्ता मिळणार नाहीये.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काल अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काल अजित पवारांनी लाडक्या बहि‍णींच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, आता पुढचे वर्षभर तरी लाडक्या बहि‍णींना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता ७-८ मार्च रोजी जमा झाला आहे. दरम्यान, यावेळीच फेब्रुवारी- मार्च अशा दोन महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता होती. मात्र, ८ मार्च महिला दिनी फक्त फेब्रुवारीचा हप्ता वितरीत करण्यात आला. दरम्यान, आता लवकरच मार्च महिन्याचाही हप्ता जमा केला जाणार आहे.

आदिती तटकरेंनी दिली माहिती (Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेता हप्ता ६ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येईल. दोन टप्प्यांमध्ये ३००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच मार्चचाही हप्ता दिला जाईल. त्यामुळे या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा होईल, म्हणजेच मार्च महिन्यात एकूण ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

या महिलांना मिळणार नाही मार्चचा हप्ता

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ९ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांनाही बाद केले जाईल. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जवळपास ५० लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आधीच नाराज होत्या. त्यात आता २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा न केल्याने निराशा अजूनच वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT