Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता ८ तारखेला आला, एप्रिलचे १५०० रूपये कधी जमा होणार?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. मार्च महिन्याचा हप्ता ८ तारखेला देण्यात येणार होता. आता एप्रिलच्या हप्त्याची महिला वाट बघत आहेत.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. मार्च महिन्याचा हप्ता ८ तारखेला देण्यात आला होता. त्यानंतर आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असे प्रश्न आता महिला विचारत आहेत. दरम्यान, एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु हप्ता १ ते ८ एप्रिलपर्यंत येईल, अशी आशा महिलांना होती. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

रामनवमीला गूड न्यूज मिळणार का?

मार्च महिन्यात महिला दिनाचे औचित्य साधून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल महिन्यात रामनवमीला हप्ता येईल, असं महिलांना वाटत होतं. रामनवमी उद्या ६ तारखेला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे उद्या लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये (These Women Will Not Get 1500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना १५०० रुपये मिळणार नाहीत. ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत तरीही योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांना अपात्र करण्यात आला आहे. ९ लाख महिलांचे अर्ज आतापर्यंत बाद करण्यात आले आहेत. अजूनही अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला की नाही कसं चेक कराल

लाडकी बहीण योजनेत थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. याचसोबत तुम्ही बँकिंग मोबाईल अॅपवर जाऊन पैसे जमा झालेत की नाही ते चेक करु शकतात. ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊन तुम्ही तुमच्या बँक बॅलेन्सची माहिती मिळवू शकतात. यामुळे तुम्हाला आधी पैसे किती होते. त्यानंतर किती पैसे जमा झाले हे लक्षात येईल. याचसोबत तुम्ही बँक पासबुकवर एन्ट्री केल्यानंतरही पैसे जमा झालेत की नाही ते समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

15 कोटींचे मोबाइल दुसऱ्या वाहनात भरले अन् पोल्ट्री फार्ममध्ये लपवले; दिल्लीहून पुण्याला जाताना मालेगावमध्ये घडला चोरीचा थरार

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांची सलग दुसऱ्या दिवशी सहा तासांहून अधिक वेळ चौकशी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! बेसिक सॅलरी ६९ हजार, पेन्शन ३४,४७० रुपये करण्याची मागणी

GK : ‘इडली कॅपिटल’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

SCROLL FOR NEXT