Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? या दिवशी खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana June-July Installment Date: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लांबणार असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आषाढी एकदशीच्या दिवशी कदाचित महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

Siddhi Hande

जून महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे. पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या महिन्यात ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

पुढच्या महिन्यात ३००० रुपये जमा होणार (Ladki Bahin Yojana June July Installment of 3000 Rupees Come Together)

लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता जून महिना संपायला अवघे २ दिवस उरले आहेत.या दोन दिवसांत जरी जूनचा हप्ता जमा केला तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी ४-५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहे.

या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana Installment Come On these Day)

लाडकी बहीण योजनेत जून-जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे. दर महिन्यात सणासुदीचा मूहूर्त साधून पैसे जमा केले जातात. जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकदाशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी दिली जाऊ शकते. जर असेल झाले तर ६ जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

जून आणि जुलैचा हप्ता एकाच दिवशी जमा होणार की नाही याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित हे पैसे एकत्र येऊ शकतात किंवा कदाचित हे पैसे दोन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दिले जाऊ शकतात. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट मिळणार, खात्यात ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यात

अगं बाई! नवरदेव आणि नवरीचा मांडवात धमाकेदार डान्स; बघता बघता व्हिडिओ झाला VIRAL

Success Story: CA झाला, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS केशव गोयल यांचा प्रवास

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

SCROLL FOR NEXT