Pandharpur Wari : महिला आयोगाचे भाविकांसाठी मोबाईल ॲप; महिला भाविकांना ॲपद्वारे माहिती घेणे सहज शक्य

Pandharpur News : पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्ताने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. अशात महिला भाविकांना गर्दीत येथे असलेल्या सुविधांची माहिती सहज उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने ॲप तयार करण्यात आले
Pandharpur Wari
Pandharpur WariSaam tv
Published On

पंढरपूर : वारीच्या वाटेवर महिला वारकरी भक्तांसाठी आता महिला आयोगातर्फे नवीन अँड्रॉइड ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून महिला वारकरी भक्तांना स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष आणि सॅनेटरी नॅपकिन स्टॉल कुठे आहेत; याची सहज माहिती उपलब्ध होणार आहे. हे ॲप वारकरी महिला भक्तांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्ताने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. महिला भाविकांची संख्या देखील कमी नाही. अशात महिला भाविकांना गर्दीत येथे असलेल्या सुविधांची माहिती सहज उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने ॲप तयार करण्यात आले आहे. तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर या आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी पालखीतळावर महिला वारकरी भक्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला.

Pandharpur Wari
Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन; प्रक्षाळ पूजेपर्यंत मंदिर राहणार खुले, आषाढी निमित्ताने भाविकांची होणार सोय

पंढपुरात १२४ हिरकणी कक्ष 
सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांवर आणि पंढरपूर शहरात एकूण १२४ हिरकणी कक्ष उभा करण्यात येत आहेत. या कक्षाच्या माध्यमातून महिलांना प्राथमिक उपचार, स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध केल्या जाणार आहेत. महिला सुरक्षेच्या व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पंढरपूरच्या वारीवर आवश्यक सर्व सुविधा दिल्या जात आहेत. याची संपूर्ण माहिती हि मोबाईल ॲपमध्ये असणार आहे.  

Pandharpur Wari
Sambhajinagar ZP : संभाजीनगर जिल्हा परिषदेत मोठा घोटाळा; काम न करता अधिकाऱ्यांनी काढली ४ कोटींची बिले

लोणीकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया 
दरम्यान भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी लाडक्या बहिण योजनेच्या पैशावरून लोक बूट चपला घालतात. असे विधान केले होते. याबाबत रूपाली चाकणकर या म्हणाल्या, कि  लोकप्रतिनिधींनी सामाजिक भान ठेवून बोलावे. लोणीकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समज देतील. शासनाच्या कुठल्याही योजनेबद्दल महिलांबद्दल भान ठेवून बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com