Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹३००० मिळणार, पण त्याआधी हे काम कराच; अन्यथा...

Ladki Bahin Yojana eKYC Deadline: लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्यामुळे त्याआधी महिलांनी केवायसी करायची आहे. अन्यथा महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख

३१ मार्चपूर्वी हे काम कराच

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता मिळवण्यासाठी एक काम करायचे आहे. जर त्यांनी हे काम केले नाही तर त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. याबाबत राज्य सरकारने माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

केवायसी करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत (Ladki Bahin Yojana eKYC Deadline 31st March 2026)

लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. तुमच्याकडे फक्त १०-१२ दिवस आहेत. या कालावधीत तुम्हाला केवायसीमधील चुका सुधारायच्या आहेत.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ होती. परंतु लाखो महिलांनी केवायसी केली नाही. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला. परंतु अनेक महिलांनी केवायसी करताना त्यात चुका केल्या आहेत. काही प्रश्न न कळल्याने चुकीची उत्तरे दिली. दरम्यान, ही चुक सुधारण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा केवायसी करु शकतात. त्यांनी चुका सुधारल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरु होणार आहे.

रखडलेले हप्ते एकत्र मिळणार

लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुकी झाल्याने महिलांचा लाभ बंद झाला आहे. आता दुरुस्ती केल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरु केला जाणार आहे. केवायसी झालेल्या महिलांना रखडलेले सर्व हप्ते मिळणार आहेत. या महिलांना डिसेंबरपासूनचा हप्ता एकत्र मिळणार आहे. त्यामुळे महिलांना ६००० रुपये एकत्र मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT