

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
लाडकी बहीण योजनेतून ९० लाख महिलांचे अर्ज बाद
निकषात न बसल्याने महिलांना मिळणार नाही पैसे
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून ९० लाख महिलांना वगळले असल्याचे सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यातून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत लाभार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने पडताळणी केली जात आहे. यामधून लाखो महिलांचे अर्ज बाद केले.
९० लाख महिलांची नावे वगळली आहे. सुरुवातीला योजनेत २.६ कोटी महिलांनी अर्ज केले होते. ही संख्या आता १.५३ कोटींवर आली आहे. या महिलांच्या पडताळणीत त्रुटी समोर आल्या आहेत. या महिला निकषात न बसल्याने त्यांचा अर्ज बाद केला आहे.
महिलांचे अर्ज का बाद केले?
ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला आहे. ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे त्यांचा लाभ बंद केला आहे. तसेच एका कुटुंबातील दोनच महिलांनी योजनेचा लाभ घ्यायचा असतो. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचा लाभ बंद केला आहे. एकूण ९० लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. केवायसी, अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीतून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अनेक महिलांनी केवायसी केले नाहीये. ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांना योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.