Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या निधीत कपात; ९५०० कोटी कापले; नेत्यानं थेट आकडेवारीच दिली

Ladki Bahin Yojana Budget Cut by 9500 Crore: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून १.०५ कोटी महिला अपात्र झाल्याचा दावा रोहिणी खडसेंनी केला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

१.०५ कोटी लाडक्या बहिणी अपात्र

रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी २६५०० कोटींची तरतूद केली आहे. २०२६-२७ साठी ही तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निधीत २६ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. एकूण ९५०० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडला, मार्चचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, अजूनही याबाबत निर्णय झालेला नाही. त्याचसोबत आता निधीमध्ये घट केल्याने अजूनच कपात केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्या जात आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. रोहिणी खडसे यांनी सरकारवर घणाघात केला आहे.

रोहिणी खडसे काय म्हणाल्या?

रोहिणी खडसे म्हणाल्या की, आता या क्षणाला विधिमंडळात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांनी भाषणे केली. तर दुसरीकडे आतापर्यंत १.० कोटी लाडक्या बहि‍णींना अपात्र ठरवले. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे? विधानसभा निवडणूकीच्या आधी सुरु केलेल्या या योजनेची आज परिस्थिती काय? निवडणूक होती तेव्हा शासनाने लाडक्या बहि‍णींना पैसे दिले, आता निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींवरचे प्रेम कमी होऊ लागले आहे. शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड में जाए जनता, अशा शब्दात शासनावर हल्लाबोल केला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

रोहिणी खडसेंनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.

सुरुवातीचे लाभार्थी २.५३ कोटी

बजेट-४५,००० कोटी रुपये

तपासणी झाल्यावर लाभार्थ्यांची संख्या- १,४८,६०,०००

बजेटमध्ये तरतूद- २६,५०० कोटी

संभाव्य अपात्र महिला-१.०५ कोटी

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १५ दिवस!लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा ₹१५०० होतील कायमचे बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com