Ladki Bahin Yojana eKYC Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, ईकेवायसीबाबत आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना ईकेवायसीत दुरुस्ती करण्यासाठी शेवटची संधी ३१ मार्चपर्यंत आहे. आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना केले आवाहन

ईकेवायसी करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दीड हजार रुपये दिले जाते.या योजनेत फक्त ईकेवायसी केलेल्या महिलांना लाभ दिला जात आहे. दरम्यान, ज्यांची ईकेवायसीत चुकी झाली आहे त्यांना दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीत दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत अनेक अफवा परसवल्या जात आहे.ईकेवायसी करण्याची मुदत संपली असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. यावर आता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या? (Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana)

आदिती तटकरेंनी लाडक्या बहि‍णींना कोणत्याही तथ्यहीन बातमीवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत.

दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत लाडक्या बहिणींना E-Kyc करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती, असं त्यांनी म्हटलं आहे.

ईकेवायसी करण्यासाठी शेवटची संधी ( Ladki Bahin Yojana eKYC Deadline)

यामुळे लाडक्या बहि‍णींच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्यामुळे महिलांकडे केवायसी करण्यासाठी अजून १० दिवस आहेत. लाभार्थी महिलांना जर ईकेवायसीत दुरुस्ती करायची असेल तर तुमच्याकडे उत्तम संधी आहे.पुढच्या आठवड्याभरात तुम्हाला हे काम करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिकेत तुफान राडा; शिवसेना-भाजप नगरसेवक एकमेकांवर धावले, परिसरात बंदोबस्त वाढवला|VIDEO

BCCIकडून राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजरवर कारवाई; डगआऊटमध्ये मोबाईल वापरणं भोवलं!

Satara Tourism : मराठा साम्राज्याचा अभिमान, साताऱ्यातील 'या' किल्ल्यावरून दिसतो कोकण किनारा

Maharashtra News Live Update: परभणीत तीव्र उन्हाचा कहर, पारा पोहचला 42 अंशांवर

चंद्रपूर हादरलं! १५ वर्षांपासूनचे प्रयत्न थकले, शेवटी हरले; ५ आदिवासी शेतकऱ्यांनी एकाच वेळी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT