Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv

Ladki Bahin Yojana eKYC: उरले शेवटचे १० दिवस! लाडक्या बहिणींनो ईकेवायसीत दुरुस्ती करा, नाहीतर ₹१५०० विसरा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी आता शेवटचे १० दिवस उरले आहेत.
Published on
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी उरले शेवटचे १० दिवस

केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. त्यानंतर महिलांना पुन्हा नव्याने केवायसी करता येणार नाही. मात्र, ज्या महिलांच्या केवायसीत काही चुका आहेत त्यांना पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीत दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹३००० मिळणार, पण त्याआधी हे काम कराच; अन्यथा...

लाडक्या बहिणींनो हे काम करा

लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. केवायसीत अनेक प्रश्न समजले नसल्याने त्यांनी चुकीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचा लाभ बंद केला आहे. मात्र, प्रश्न नीट कळला नसल्याने या चुका झाल्या आहेत, हे निदर्शनास आले. त्यानंतर महिलांना केवायसीत दुरुस्ती करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकीचा लाभ घेणाऱ्यांपैकी ८३ टक्के महिला विवाहित, तर फक्त ४.७ टक्के विधवा, आकडेवारी आली समोर

केवायसी करण्याची प्रोसेस (Ladki Bahin Yojana eKYC)

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी ऑनलाइन प्रोसेस आहे.

तुम्हाला adakibahin.maharashtra.gov.in वर जायचे आहे.

यानंतर ईकेवायसीमध्ये चुका झालेल्यांना दुरुस्ती करण्याची संधी या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाका.

यानंतर इतर आवश्यक माहिती भरा. यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: पुण्यात सर्वाधिक लाडक्या बहिणी, ८३ टक्के विवाहित महिला घेतायत लाभ, आकडेवारी समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com