Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात पण या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये

These Women Will Not Get Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही महिलांना १५०० रुपये मिळणार नाहीत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) महिलांना एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाहीये.

आदिती तटकरे काय म्हणाल्या? (Aditi Tatkare)

मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत एप्रिलच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरेंनी म्हटलंय की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात दिला जाईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही एकही रुपया (These Women Will Not Get 1500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. दरम्यान, या योजनेतील काही अर्जदार महिलांना एकही रुपया मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या महिला सरकारी नोकरी करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकदा तुम्ही अपात्र ठरला की तुम्हाला यापुढेही कोणत्याही हप्ता मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT