Shruti Vilas Kadam
चिया बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-३ मुबलक प्रमाणात असते. या बिया पोट भरल्यासारखे वाटायला मदत करतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर असते. या बिया इम्युनिटी मजबूत करतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
सूर्यफूल बियांमध्ये व्हिटॅमिन ई असते, जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
तिळामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर असते. नियमित सेवन केल्यास हाडे आणि दात मजबूत राहतात.
या सर्व बियांमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
काही बियांमधील नैसर्गिक घटक शरीरातील हॉर्मोन संतुलित ठेवण्यास मदत करतात, विशेषतः महिलांसाठी हे फायदेशीर ठरते.