Famous Actor Father Death : प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक, मनोरंजन विश्वावर शोककळा

Karanvir Bohra Father Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले. अभिनेत्याचे वडील बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम करायचे.
Karanvir Bohra Father Passes Away
Famous Actor Father Deathsaam tv
Published On
Summary

टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले.

अभिनेत्याच्या वडीलांचे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध नाव आहे.

मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्यांच्या वडीलांचे निधन झाले. होळीच्या उत्सवात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर बोहरावर (Karanvir Bohra ) दुःखाचा डोंगर कोसळला. करणवीरचे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेंद्र बोहरा (Mahendra Bohra) यांचे निधन झाले. करणवीर बोहराने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये वडीलांच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात महेंद्र बोहरा यांचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत फोटो पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओत सुंदर फॅमिली फोटो देखील दिसत आहे.

करणवीर बोहराची पोस्ट

"आय लव्ह यू बाबा! शब्दांत सांगता येणार नाही इतकी मला तुझी आठवण येत आहे. ज्यांनी पालक गमावले आहेत त्यांना या वेदना माहित असतील. पण या वेदनेमध्येही मला शांती मिळते की, तू एक परिपूर्ण, सुंदर जीवन जगलास. तू आम्हाला नेहमीच हवे तसे वागू दिलेस...शांततेने आणि दुःखाशिवाय. तू दीदी आणि मला खरोखर महत्त्वाचे सर्वकाही शिकवलेस. जीवन कितीही कठीण असले तरी आशा सोडू नका. पडल्यावर पुन्हा उठण्यासाठी, ऊर्जा, उत्कटता आणि सकारात्मकतेने जगण्यासाठी. कधीही न हार मानण्यासाठी, तुम्ही मजबूत रहा.

तू मला स्वप्न पहायला शिकवलेस - निर्मात्याचा अभिनेता बनायला, कधीही तुझा शॉट पूर्ण केल्याशिवाय सेट सोडू नकोस. तू मला दयाळू व्हायला शिकवलेस. तू मला जगायला शिकवलेस. तुझ्याबद्दल बोलणारा प्रत्येक माणूस एकच गोष्ट सांगतो की, तू किती चांगला माणूस होता. दीदी आणि मला खूप अभिमान आहे तुझा. मी तुमचा मुलगा म्हणून जन्माला आलो आणि ती तुमची मुलगी म्हणून जन्माला आली याबद्दल आम्ही नेहमीच आभारी आहोत. बाबा, मेरी जान, मेरा दिल तुझपे कुर्बान, नेहमीच आणि आता तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सुरू करा..."

महेंद्र बोहरा यांचे काम

महेंद्र बोहरा हे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक होते. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. महेंद्र बोहरा यांचा जन्म 1946 ला जोधपूर येथे झाला होता. 'तेजा', 'टक्कर', 'लष्कर', 'प्यार का कर्ज', 'हुमे तुमसे प्यार कितना' आणि 'गोपाला' यांसारखे चित्रपट त्यांनी केले आहेत. त्यांनी संजय दत्त, जुही चावला, सुनील शेट्टी, नसीरुद्दीन शाह, सोनाली बेंद्रे आणि असरानी यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे.

Karanvir Bohra Father Passes Away
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; शस्त्रक्रिया देखील झाली, हॉस्पिटलमधून फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com