Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; शस्त्रक्रिया देखील झाली, हॉस्पिटलमधून फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट

Famous Actress Diagnosis Breast Cancer : प्रसिद्ध अभिनेत्रीची नुकतीच ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया पार पडली. सोशल मीडियावर फोटो शेअर करून अभिनेत्रीने याची माहिती दिली आहे.
Famous Actress Diagnosis Breast Cancer
Famous Actresssaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाला.

अभिनेत्रीवर नुकतीच शस्त्रक्रिया देखील झाली आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आपली हेल्थ अपडेट दिली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे आपल्या हेल्थमुळे चर्चेत आली आहे. राजश्रीला ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले असून तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. राजश्री देशपांडेने हॉस्पिटलमधून फोटो शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली आहे. आपले हेल्थ अपडेट तिने सांगितले आहे. सध्या राजश्रीची प्रकृती स्थिर आहे. फोटोंमध्ये ती सुंदर हसताना दिसत आहे.

राजश्रीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, राजश्रीला Infiltrating ductal carcinoma (NOS)ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सर आहे. नियमित वैद्यकीय तपासणी दरम्यान राजश्रीला आपल्याला कर्करोग असल्याचे समजले. तसेच तिला योग्य वेळेवर हे समजल्यामुळे तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. ती म्हणाली की, "खूप टेस्ट आणि शस्त्रक्रिया... ही एक रोलरकोस्टर राईड वाटली. पण माझ्यावर विश्वास ठेवा, सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याने मला त्यातून बाहेर काढले...शस्त्रक्रियेनंतर माझ्या आई आणि वडिलांचे चेहरे पाहून माझी भीती पळून गेली. सर्वांच्या पाठिंब्यामुळे, मी जगाला तोंड देण्यास तयार आहे असे मला वाटते. मी लवकर बरी होणार आहे आणि मला लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील मिळेल.

राजश्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते, कलाकार कमेंट्स करत आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. तिला काळजी घेण्याचे सांगत आहेत. तिला पाठिंबा देताना दिसत आहे. ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे. राजश्री देशपांडेवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. तसेच तिच्या हिंमतीचे कौतुक केले जात आहे.

राजश्री देशपांडे कोण?

राजश्रीने 2012 साली रिलीज झालेल्या 'तलाश' या चित्रपटात एका छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'कुछ तो लोग कहेंगे' आणि '२४: इंडिया' सारख्या शोमध्ये दिसली. 'किक' मध्ये सहाय्यक भूमिकेने ती मोठ्या पडद्यावर परतली. 'सेक्रेड गेम्स' मधून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती 'द स्काय इज पिंक', 'मॉम', 'मंटो' आणि 'जोराम' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. 'द फेम गेम', 'ट्रायल बाय फायर', 'ब्लॅक वॉरंट' आणि 'रंगीन' सारख्या बेव सीरिजमध्ये दिसली.

Famous Actress Diagnosis Breast Cancer
Dhurandhar Actress : 'धुरंधर' गर्लवर बलात्काराचा प्रयत्न, स्पॉट बॉयचं काळं कृत्य सांगताना अभिनेत्रीचा संताप अनावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com