Hingoli News: आरोग्य यंत्रणा 'झोपवली', शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं

Hingoli Government Hospital: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीच्या आखाडा बाळापूरच्या सरकारी रुग्णालयात जीवघेण्या थंडीत महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर चक्क फरशीवर झोपवण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
Hingoli News: आरोग्य यंत्रणा 'झोपवली', शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं
Hingoli Government Hospital:Saam Tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमध्ये सरकारी रुग्णालयात आरोग्य विभागाची लक्तरं वेशीला टांगली गेल्याची घटना घडलीय. महिलांना शस्त्रक्रियेनंतर कुडकुडत्या थंडीत जमिनीवर झोपवण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना नेमकी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

आरोग्य विभागाकडून रुग्णांची हेळसांड झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीच्या आखाडा बाळापूरच्या सरकारी रुग्णालयात जीवघेण्या थंडीत महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर चक्क फरशीवर झोपवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. हे संतापजनक वृत्त साम टीव्हीने दाखवलं आणि राज्यात एकच खळबळ उडाली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला असतानाही स्थानिक सत्ताधारी आमदार संतोष बांगर यांनी मात्र महिलांची कुठलीही हेळसांड न झाल्याचा जावईशोध लावला.

Hingoli News: आरोग्य यंत्रणा 'झोपवली', शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं
Hingoli : आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, शस्त्रक्रियेनंतर ४३ महिलांना जमिनीवर झोपवले, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

कुटुंब नियोजनासाठी रुग्णालयांना शस्त्रक्रियेचं टार्गेट दिलं जातं. रुग्णालयांकडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी एकाच दिवशी शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. अपुऱ्या सुविधा असतानाही तब्बल ४३ महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने थंडीत महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Hingoli News: आरोग्य यंत्रणा 'झोपवली', शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं
Hingoli News: शिवस्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयामध्ये उपचार सुरू

या सगळ्या संतापजन प्रकाराचा सामटीव्हीनं भांडाफोड केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वृत्ताची दखल घेतली. फडणवीसांनी तातडीनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर खडबडून जागा झालेला हिंगोलीचा आरोग्य विभागही कामाला लागला आणि हिंगोलीहून आखाडा बाळापूरला १० बेड पाठवण्यात आले. तर दोषी डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Hingoli News: आरोग्य यंत्रणा 'झोपवली', शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं
Hingoli News : वंचितच्या उमेदवारांवर अज्ञातांकडून हल्ला; गाडीवर केली दगडफेक

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारी रुग्णालयात बोगस औषधांचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच आता आखाडा बाळापूरच्या रुग्णालयात प्रशासनाचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. त्यामुळे सरकारने आरोग्य विभागाची लक्तरं वेशीला टांगणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करायला हवी. अशा डॉक्टरांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Hingoli News: आरोग्य यंत्रणा 'झोपवली', शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं
Hingoli News: शिवस्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयामध्ये उपचार सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com