Hingoli : आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, शस्त्रक्रियेनंतर ४३ महिलांना जमिनीवर झोपवले, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

hingoli latest News : मराठवाड्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
Hingoli Latest Health News
Hingoli Latest Health News
Published On

Hingoli Latest Health News : मराठवाड्यात आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. मराठवाड्यातील हिंगोलीच्या बाळापूर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांना जमिनीवरच झोपवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. येथील रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपविण्यात आल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच या महिलांना रूग्णालयात जमिनीवर झोपायला दिले. कडाक्याची थंडी असताना, या महिलांना देखील जमिनीवर झोपवण्यात आल्याने हिंगोलीत संतापजनक प्रतिक्रिया दिल्या जात आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या विरोधात संताप व्यक्त करत आता कार्यवाई करण्याची मागणी केली आहे.

Hingoli Latest Health News
Maharashtra Weather : राज्यात गारठा कायम, पण किमान तापमानात वाढ होणार, IMD चा अंदाज

केंद्र व राज्याच्या आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वच रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी टार्गेट देण्यात येत आहेत. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दर दिवशी मोठ्या संख्येने या महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात एकत्रित बोलवण्यात येतं. मात्र रुग्णालयात पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची बाब रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टरांनी अधोरेखित केली आहे.

Hingoli Latest Health News
Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल ४० मिनिटे उशिरा

बाळापूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अपुऱ्या सोयी सुविधा संदर्भात कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली नाही. या संपूर्ण प्रकरणात आपण सखोल चौकशी करणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी दिली आहे. हिंगोलीतील या प्रकरामुळे संतापाची लाट उसळळी आहे. प्रशासनावर टीकेचा भडीमार होत आहे. लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com